Home » ब्रेकिंग न्यूज » धनुभाऊ….लवकर बरे व्हा..

धनुभाऊ….लवकर बरे व्हा..

धनुभाऊ….लवकर बरे व्हा..

– डोंगरचा राजा/ आँनलाईन.

निवडणूकीतील जय-पराजय, राजकीय डावपेच, मंत्रीपद, पालकमंत्रीपद यापलीकडे  धनंजय मुंडे यांचे संघटन कौशल्य अद्वितीय आहे. धनंजय मुंडे यांनी जपलेले कार्यकर्ते जिवाभावाचे आहेत. त्यांचे हे कौशल्यच त्यांना राजकीय शिखरावर घेऊन जाणारे ठरत आहे. रात्र असो, दिवस असो, कार्यकर्ता लहान असो अथवा मोठा असो धनंजय मुंडे सर्वांसाठी उपलब्ध असतात. आता मंत्रीपद सांभाळत असतांनाही परळीतील त्यांच्या कार्यकर्त्याच्या एका फोनवर ‘डी.एम.’ शी संपर्क साधता येतो. काही दिवसांपूर्वीच एका पोलिस कर्मचार्‍याने मेडीकल चालकाला अडवल्यानंतर धनंजय मुंडे यांच्याशी झालेला त्यांचा संवाद चांगलाच लोकप्रिय झाला होता. नेत्याच्या वाटचालीत कार्यकर्ता महत्त्वाचा असतो, हा कार्यकर्ता कसा जपायचा हेच धनंजय मुंडे दाखवून देत आहेत.

आता कोरोना संसर्गाच्या काळातही जनता अडचणीत असतांना धनंजय मुंडेंनी संपूर्ण मतदारसंघात मदतीचे वाटप केले. अगदी किराणा किट, सॅनिटायझर, हँडवॉश, मास्क पासून ते ईदकरिता शिरखुर्म्याच्या साहित्यापर्यंत लागेल ती मदत केली. पालकमंत्री म्हणून जिल्ह्याची जबाबदारी सांभाळतांना प्रशासनास निर्देश देत जिल्हा कोरोना संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केले. दुर्दैवाने जिल्ह्यात रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले.एव्हढेच नव्हे तर अंबाजोगाईत स्वाराती रुग्णालयात कोरोना चाचणीसाठी लॅबही उभारली. या सर्व धावपळीत स्वतःच्या सुरक्षेकडे मात्र त्यांनी तितकेसे लक्ष दिले नाही. परिणामी त्यांनाही कोरोना संसर्ग झाला. पण हा लढवय्या नेता कोरोनाला नक्कीच हरवणार, असा विश्‍वास जिल्हावासीयांना आहे. कोरोना संकटाच्या काळात अविरतपणे कार्यरत राहणारा या नेत्याच्या पाठीशी जिल्हावासीयांचे आशिर्वाद, प्रार्थना आहेत. कोरोनाा हरवून धनुभाऊ पुन्हा एकदा जनसेवेसाठी सज्ज होतील असा आम्हाला ठाम विश्‍वास आहे… धनुभाऊ कोरोना संसर्गातून बरे व्हावेत ही डोंगरचा राजा परिवाराच्या वतीने ईश्‍वरचरणी प्रार्थना…!

अनिल वाघमारे
संपादक,डोंगरचा राजा

Leave a Reply

Your email address will not be published.