नागपूर धावले बीडच्या मदतीला..
केज प्रतिनिधी – शरद गिराम
केज – युवा रुरल असोसिएशन नागपूर व युवा ग्राम विकास मंडळ केज यांच्या संयुक्त विद्यमाने केज तालुक्यातील 60 गरजू कुटुंबांना प्रति 500 रुपये किमतीच्या रेशन क्रिट वाटप करण्यात आले. फिजिकल डिस्टन्स बाळगत या मदतीचे वाटप करण्यात आले.
लॉक डाऊन च्या परिस्थितीत हाताला काम धंदा नसल्याने मजूर कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. आहे अशा कुटुंबांना आधार देण्यासाठी युवा रुरल असोसिएशन नागपुर व युवा ग्राम विकास मंडळ केज च्या वतीने 60 कुटुंबांना रेशन किट चे वाटप करण्यात आले यावेळी युवा ग्राम विकास मंडळाचे कार्यकारी सचिव एच .पी देशमुख ,यशवंत भोईटे, नितीन देशमुख, बाबुराव देशमुख ,प्रकाश काळे व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते .यापुढे उर्वरित कुटुंबासाठी मदत देण्यात येणार आहे.