लवकर बरा हो..
-/डोंगरचा राजा / आँनलाईन.
– ताईंनी केली धनुभाऊ ची चौकशी..
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना बहीण पंकजा मुंडे यांनी फोन करून आस्थेवाईकपणे चौकशी करत लवकर बरा होऊन कामाला लागा अशा शुभेच्छा दिल्या.
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय सख्य सर्वश्रुत आहे.
दरम्यान धनंजय मुंडे यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना फोन करून प्रकृतीची विचारपूस केली त्यांना काळजी घे.. लवकर बरा हो.. घरी काय परिस्थिती आहे असे विचारत आराम करण्याचा सल्ला दिला.