Home » ब्रेकिंग न्यूज » बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू.

बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू.

बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू.

-/ डोंगरचा राजा / ऑनलाइन.

वडवणी – शुक्रवारी बीड जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह जोराचा पाऊस सुरू होता. या कालावधीत विज कोसळून वडवणी तालुक्यातील मोरवड येथील बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

वडवणी तालुक्यातील मोरवड येथील
विष्णू अशोक अंडील वय 17 वर्ष व पूजा अशोक अंडील वय 15 वर्ष हे दोघे बहीन भाऊ आपल्या शेतामध्ये गेले असताना जोराचा पाऊस सुरू झाला. त्यावेळी वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाटही सुरू झाला. आणि वीज अंगावर कोसळून या दोन्ही बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने मोरवड मध्ये शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.