Home » ब्रेकिंग न्यूज » देशमुखांची विधानपरिषदेवर नियुक्ती करावी.

देशमुखांची विधानपरिषदेवर नियुक्ती करावी.

देशमुखांची विधानपरिषदेवर नियुक्ती करावी.

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

बीड – महाराष्ट्रातील पत्रकारांचे आधारस्तंभ, ज्येष्ठ संपादक, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांची राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी बीड जिल्हा मराठी पत्रकार संघानं केली आहे.. जिल्हा पत्रकार संघाने राज्यपाल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे तसे निवेदन पाठविले आहे..
निवेदनात म्हटले आहे की, राज्यपालांकडून बारा विधान परिषद सदस्यांची लवकरच नियुक्ती केली जाणार आहे.. राज्यपालांनी आपल्या कोट्यातून विचारवंत, साहित्यिक, कलावंत, पत्रकारांची नियुक्ती करावी अशी अपेक्षा असते.. राज्यपालांनी ही अपेक्षा पूर्ण करताना ज्येष्ठ पत्रकार आणि बीड जिल्हयाचे भूमीपूत्र एस.एम.देशमुख यांच्या नावाचा प्राधान्याने विचार करावा अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे..
एस.एम.देशमुख गेली 35 वर्षे पत्रकारितेत सक्रीय आहेत .. पैकी 23 वर्षे विविध मान्यवर दैनिकात त्यांनी एक यशस्वी संपादक म्हणून भूमिका पार पाडलेली आहे.. सामांन्य माणूस हा एस.एम.देशमुख यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू राहिलेला आहे.. आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी जनतेचे प्रश्न अग्रक्रमाने मांडले, त्यांना न्याय मिळवून दिला.. कोकणात असताना त्यांनी लोकहिताचे अनेक लढे ऊभारले आणि समर्थपणे त्यांचे नेतृत्व केले.. रायगड जिल्ह्यातील सामान्यांना बेघर करणारया सेझ विरोधी आंदोलनात एस.एम.देशमुख सक़ीय होते.. मुंबई – गोवा महामार्ग ही कोकणची लाइफलाइन आहे, हा महामार्ग चौपदरी झाला तर कोकणच्या विकासाचे महाद्वार उघडेल, शिवाय निष्पाप जनतेचे जाणारे बळी देखील थांबतील या जाणिवेतून एस.एम.देशमुख यांनी महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी लढा ऊभारला, त्याचे नेतृत्व केले, आणि अखेर त्यात यश ही मिळविले.. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आता वेगानं सुरू आहे.. त्याचं श्रेय एस. एम. यांनी उभारलेल्या पत्रकारांच्या लढ्याला आहे..
पत्रकार जगाची दु:ख वेशिवर टांगतात, मात्र त्यांच्या व्यथा कधीच लोकांसमोर येत नाहीत. एस.एम.देशमुख यांनी सर्वप्रथम पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडली, पत्रकारांना संघटीत केले आणि राज्यात पत्रकारांची मोठी चळवळ उभी केली.. त्यातून २२ वर्षे प्रलंबित असलेला पत्रकार पेन्शनचा विषय मार्गी लागला.. पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांना एस.एम.देशमुख व्यथित व्हायचे.. पत्रकारांना कायदेशीर संरक्षण मिळावे यासाठी एस. एम. यांनी लढा ऊभारला आणि तो यशस्वी करून दाखविला.. देशात महाराष्ट्र हे पहिले आणि एकमेव असे राज्य आहे की जेथे पत्रकारांना कायदेशीर संरक्षण मिळालेलं आहे… पत्रकार आरोग्य सुविधा असो, की छोटया वर्तमानपत्रांचा जाहिरात दर वाढीचा प्रश्न असो एस. एम यांच्या कुशल नेतृत्वाखाली हे सारे प्रश्न सुटले आहेत.. जो विषय त्यांनी हाती घेतला तो त्यांनी सोडविला त्यामुळे महाराष्ट्रातील पत्रकार एस.एम. यांचा उल्लेख “सक्सेसफुल मॅन” असा करतात..
एस.एम.देशमुख चतुरस्त्र लेखक आहेत. त्यांची आठ पुस्तकं प्रसिध्द झाली आहेत.. विविध दैनिकात पाच हजारांवर लेख प्रसिद्ध झाले आहेत.. मराठी वाहिन्यांवरील चर्चेत देशमुख यांचा सातत्यानं सहभाग असतो.. देशमुख यांना विविध २१ पुरस्कार मिळाले आहेत… शेती विषयक लिखाणाबद्दल महाराष्ट्र सरकारने कृषीमित्र हा पुरस्कार देऊन राज्यपालांच्या हस्ते त्यांचा गौरव केला आहे.. एस.एम यांनी विविध शासकीय समित्यांवर अनेक वेळा काम केले आहे.. आपल्या देवडी या गावात सकाळच्या माध्यमातून मोठा बंधारा ऊभा करून गावातील पाणी टंचाईला हद्दपार करण्याचा प़यत्न त्यांनी केला आहे..
राज्यपालांनी त्यांना विधान परिषदेवर काम करण्याची संधी द्यावी अशी विनंती निवेदनात जिल्हा संघांने केली आहे..
निवेदनावर अध्यक्ष सुभाष चौरे, परिषदेचे प्रसिध्दी प्रमुख अनिल महाजन,विभागीय सचिव विशाल सोळंके,अधिस्वीकृती सदस्य अनिल वाघमारे,कार्याध्यक्ष दत्तात्रय अंबेकर,सरचिटणीस विलास डोळसे,
आदिंच्या स्वाक्ष-या आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published.