Home » माझा बीड जिल्हा » गल्ली बोळात फिरु नये – अँड.अजित देशमुख.

गल्ली बोळात फिरु नये – अँड.अजित देशमुख.

गल्ली बोळात फिरु नये – अँड.देशमुख.

-/डोंगरचा राजा / आँनलाईन.

– शिक्षकांनी शाळेला विद्यार्थी शोधण्यासाठी गल्ली बोळात फिरु नये

– होम क्वारंटाईन बाहेर निघू नका, जेल मध्ये जाल.

बीड – वेगवेगळ्या शाळांना विद्यार्थी संख्या वाढावी, या उद्देशाने संस्था चालकांना शिक्षकांना गल्लीबोळ्यात फिरवण्याची सवय आहे. इतर वेळी अशी पद्धत वापरणे चालते. मात्र कोरोनाचा काळामध्ये शिक्षक आणि शिक्षिका गल्ली बोळात फिरत असतील, तर ही बाब पूर्णपणे चुकीची असून त्यांना फिरवणाऱ्या संस्था चालकांवर फौजदारी कारवाई होणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षकांनी शाळांमध्ये विद्यार्थी वाढविण्यासाठी गल्लीबोळात फिरून पालकांना भेटू नये आणि फिरने ताबडतोब बंद करावे अन्यथा त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जाईल, असा इशारा जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी दिला आहे.

काही भागांमध्ये शिक्षक विद्यार्थ्याच्या शोधात शहरात फिरत असल्याच्या तक्रारी जन आंदोलनाला प्राप्त झाल्या आहेत. शिक्षकांना आणि संस्था चालकांना या बाबी बंद करायला हव्यात. मात्र आपली पदे टिकली पाहिजेत आणि आपली संस्था विद्यार्थी असलेली संस्था असावी, या उद्देशाने शिक्षक आणि संस्था चालक हे गैर कृत्य करत आहेत.

याबाबत जन आंदोलनाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांना माहिती दिली असून संस्था चालकांना याबाबत आदेशित करावे, अशी ही विनंती केली आहे. संस्था चालक काहीही सांगत असतील तर शिक्षकांनी या मुद्द्यावर त्यांचे ऐकू नये. जर संस्था चालक बळजबरी करीत असतील तर ही बाब प्रशासनाला कळवावी. काळ गंभीर असल्याने शिक्षकांनी संस्था चालकाला घाबरू नये.

स्वतः बरोबरच गल्ली बोळातील नागरिकांना एकत्र करून चर्चा करणे, कोणाशीही जवळीक साधने म्हणजे सोशल डिस्टनसिंग न ठेवणे, अथवा गर्दीमध्ये फिरणे या बाबी सध्यातरी शिक्षकांनी करू नयेत. गल्ली बोळातील लोकांनी देखील या शिक्षकांना आमच्या गल्लीत येवू नका, असे स्पष्ट बजावले पाहिजे.

जिल्ह्याने आतापर्यंत चांगले सहकार्य केले आहे. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये बीड शहरात घडलेल्या काही घटना जन जीवन विस्कळीत करीत आहेत. त्यामुळे जनतेने प्रशासनाचे संपूर्ण आदेश ऐकावेत आणि कोरणा मुक्त बीड करण्यासाठी माणुसकीचे दर्शन घडवावे. होम क्वारंटाईन केलेले लोक बाहेर फिरत असतील, तर तेही प्रशासनाला तात्काळ कळवावे, म्हणजे त्यांचेवर गुन्हे दाखल होतील, असे ही देशमुख यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.