Home » देश-विदेश » ओडिशातील कुटुंबांना प्रविणची साथ.

ओडिशातील कुटुंबांना प्रविणची साथ.

ओडिशातील कुटुंबांना प्रविणची साथ.

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

वडवणी – कोरोना व आंफन चक्रीवादळ या दुहेरी संकटामध्ये अडकलेल्या ओडिशा मधील शेकडो कुटुंबांना रेशन किट व Sanitizer यांचं वाटप करण्याचं काम अहोरात्र चालू आहे. प्रविण यांनी हे काम त्यांनी स्थापन केलेल्या युवा विकास या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केले आहे. प्रविण व त्यांची टीम मार्च पासून लॉकडाऊन मध्ये बेरोझगार झालेल्या व गरीब कुटुंबांना गरजेच्या जीवनावश्यक रेशन किट चां पुरवठा करत आलेली आहे. त्यांनी आता पर्यंत ३००० पेक्षा जास्त कुटुंबांना रेशन , मास्क व सनिटायझर चा पुरवठा केलेला आहे.
हे कमी की काय म्हणून काही दिवसापूर्वी आलेल्या चक्री वादळ अंफन मध्ये तेथील जनतेची अवस्था खूपच बिकट झाली. युवा विकास या संस्थेने त्यांची गरज ओळखून ताबडतोब पीडित कुटुंबांना जेवण, उध्वस्त झालेल्या १०० घरांना ताडपत्री लाऊन देण्याचे कार्य केले. या कामामध्ये त्यांना अझीम प्रेमजी फाऊंडेशन व दिल्लीतील गुंज फाऊंडेशन तसेच अनेक दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत केली. या कामामुळे त्यांची सर्वच स्तरातून वाहवा होत आहे.
प्रविण मीटकर हे वडवणी तालुक्यातील बावी तांडा येथील रहिवाशी असून त्यांचं शालेय शिक्षण वडवणी व तेलगाव येथून झाले आहे. पुढे बलभीम येथून १२ वी करून औरंगाबाद येथील MIT मधून इंजिनीरिंग पूर्ण केले. इंजिनीरिंग नंतर त्यांना SBI ची युथ फॉर इंडिया नावाची फेलोशिप मिळाली. त्यात त्यांनी ओडिशा च्या आदिवासी भागात काम करायचं ठरवलं. व २०१५ पासून त्यांनी ओडिशा च्या वेगवेगळ्या भागात आदिवासी शेतकऱ्यानं सोबत काम केलं.
गेली ५ वर्ष प्रविण यांनी ओडिशा सरकार , नाबार्ड व काही इतर आंतरराष्ट्रीय संस्था सोबत मिळून आदिवासी शेतकऱ्यानच्या विकासासाठ्ठी मोठं काम उभ केलं आहे. याच दरम्यान त्यांनी युवकांचे भविष्य उज्वल घडवण्याच्या उद्देशाने युवा विकास या सामाजिक संस्थेची ची उभारणी केली. ओडिशातील बहुसंख्य कामगार महाराष्ट्र, गुजरात, केरळ व दिल्ली सारख्या राज्यातून परत येत आहेत. त्यामुळे त्या भागात परत आलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यातच कायमस्वरूपी रोजगार कसा मिळवून देता येईल यावर युवा विकास संस्था सध्या काम करत आहे. संस्थे तर्फे १२०० मजुरांना शेती विषयक कामे देण्याचा प्रकल्प प्रविण यांनी बनवला आहे. मान्सून च्या आगमनाने भात शेतीची कामे सुरू होतील व अनेक मजुरांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रवीण मिटकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी बीड जिल्ह्यातील अनेक प्रश्नांवर काम सुरू असून लवकरच संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात काम सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला. वडवणी तालुक्यातील अनेक तरुणांना प्रेरणादायी, आदर्श अस काम प्रवीण यांच्या हातून झाल्याचे सर्वच स्तरातून बोलल्या जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.