Home » महाराष्ट्र माझा » राज्यपाल दखल घेणार का? – शिवसंग्राम.

राज्यपाल दखल घेणार का? – शिवसंग्राम.

राज्यपाल दखल घेणार का? – शिवसंग्राम.

– हिंगोली / संतोष मानकर.

– शिवसंग्रामचे देवानंद जाधव यांचा प्रश्न

हिंगोली – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पास करण्याच्या निर्णयाला आडकाठी न आणता विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करावा अन्यथा विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी राज्यपाल महोदयांनी घ्यावी,” असे मत शिवसंग्राम युवक चे जिल्हाध्यक्ष देवानंद जाधव यांनी व्यक्त केले आहे.

“राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय हा कोरोनाच्या  संकटाचा विचार करून घेतलेला असताना काही विद्यार्थी संघटना राजकीय स्वार्थासाठी राज्यपालांकडे जाऊन परीक्षा झाल्या पाहिजेत ही मागणी करतात. वास्तविक पाहता जर आठ ते दहा लाख विद्यार्थ्यांना परीक्षासाठी जायचं असेल तर त्यांच्या आरोग्याला काही बाधा पोहोचणार नाही याची जबाबदारी राज्यपाल घेणार का? किंवा अभाविप घेणार का? अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही गोव्यामध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा होऊ नये, ही मागणी करते तर महाराष्ट्रामध्ये मात्र परीक्षा व्हावी, ही मागणी करते यातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची विद्यार्थ्यांप्रती दुटप्पी भूमिका दिसून येते.

“राज्याचे राज्यपाल महोदयांनी कृपया महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करावा. आपण राज्यातील संपूर्ण विद्यापीठाचे कुलपती आहात आपण देखील कधीतरी विद्यार्थी राहिलेले आहात त्यामुळे आपण विद्यापीठाचे कुलपती नाही तर एक विद्यार्थी म्हणून विचार करावा व मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पास करण्याच्या निर्णयाला विचार करावा असे शिवसंग्राम युवक चे जिल्हाध्यक्ष देवानंद जाधव यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.