Home » ब्रेकिंग न्यूज » खताच्या पावत्या घ्या – अँड.अजित देशमुख.

खताच्या पावत्या घ्या – अँड.अजित देशमुख.

खताच्या पावत्या घ्या – अँड.अजित देशमुख.

– डोंगरचा राजा / आँनलाईन

– बोगस बियाणे बाजारात ?
शेतकऱ्यांनो बियाणे आणि खताच्या पावत्या घ्या.

– दुकानदारांनो, फसवू नका

बीड – जिल्ह्यात चांगल्या चांगल्या कंपनीची बियाणे गेल्या वर्षी धोकेदायक ठरलेली आहेत. उगवण क्षमता कमी असणे, पिके चांगली न येणे, असे प्रकार यातुन घडतात. त्यामूळे शेतकऱ्यांनो बि-बियाणे आणि खते खरेदी करताना दुकानाचा नोंदणी क्रमांक, सि.एस.टी. आणि जी.एस.टी. क्रमांक असलेल्या पावत्याच घ्याव्यात. ज्यावर हे क्रमांक नाहीत, त्या पावत्या बोगस असतात, त्यामुळे शेतकऱ्यांनो दक्षता घ्या, खऱ्या पावत्या घ्या, फसू नका, असे आवाहन ज्येष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त तथा राज्य समिती सदस्य अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.

कर चुकविण्याच्या उद्देशाने व्यापारी वर्ग मोठा खटाटोप करीत असून, त्याच प्रमाणे बोगस बियान्याचा सुळसुळाट देखील मोठ्या प्रमाणात असतो. हे सर्व गैरप्रकार करण्यासाठी विना क्रमांकाच्या पावत्या देवून ग्राहकांच्या बोळवन केली जाते. दुकानदार आपल्या ओळखीचा आहे, असे समजून शेतकरी दुकानदारांकडून अश्या पावत्या घेतात. परंतु दुकानदार आपल्याला फसवीत आहे की काय ? हे पाहत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. म्हणून पक्क्या पावत्या गरजेच्या आहेत.

शेतकऱ्यांनी पाऊस पडल्यानंतर बियाण्यांची लागवड केल्यानंतर जर उगवन क्षमता कमी आहे, बियाणे उगवलेच नाही, असे आढळून आल्यास, त्याच्या तक्रारी कृषी आणि महसूल विभागाकडे लेखी स्वरूपात नोंदविणे आवश्यक आहे. कृषी विभागाकडून अशा वेळी पंचनामे होतात.

बोगस बियाणे, उगवण क्षमता कमी असलेली बियाणे, त्यामुळे आपले नुकसान झालेले असल्यास, आपणास या पंचनाम्या आधारे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात व न्यायालयात दाद मागता येईल. त्यामुळे पक्क्या पावत्या घ्याव्यात. कोणावरही भरवसा ठेवू नये. जर बियाणे उगवले नाही तर अशा तक्रारी कराव्यात, असे आवाहन अँड. देशमुख यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.