Home » महाराष्ट्र माझा » हिंगोलीत तब्बल ४५ रुग्ण निगेटिव्ह

हिंगोलीत तब्बल ४५ रुग्ण निगेटिव्ह

हिंगोलीत तब्बल ४५ रुग्ण निगेटिव्ह

– जिल्हा प्रतिनिधी – संतोष मानकर

– दिलासादायक ; हिंगोलीत एकाच दिवशी तब्बल ४५ रुग्ण निगेटिव्ह, आज रोजी केवळ ३२ रुग्ण पॉझिटिव्ह,

दिलासादायक ; हिंगोलीत एकाच दिवशी तब्बल ४५ रुग्ण निगेटिव्ह
केवळ ३२ रुग्ण पॉझिटिव्ह, जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल
हिंगोली –  जिल्ह्यात आयसोलेशन वॉर्ड व कोरोना केअर सेन्टर येथे ७७ पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु होते. मात्र बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास अहवाल प्राप्त होताच तब्बल ४५ रुग्ण निगेटिव्ह आल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. आता केवळ ३२ रुग्ण पॉझिटिव्ह असून जिल्ह्याची  कोरोनामुक्ती वाटचाल होत आहे. त्यामुळे आजच्या निगेटिव्ह रुग्ण संख्येमुळे जिल्हा प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, हिंगोली कोरोना केअर सेंटर येथे सुमारे २९ रुग्ण कोरोना बाधित होते. यामध्ये खांबाळा नऊ, माळसेलू एक, इंचा तीन, वडद एक, भिरडा एक, बासंबा एक, लिंबाळा एक, पेन्शनपुरा एक, बागवानपुरा चार, आनंदनगर एक, सिद्धार्थनगर पाच यांचा समावेश आहे.तर जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्ड येथे औंढा तालुक्यातील देवाळा गावातील रुग्ण ,पहेनी दोन, सुरजखेडा एक, अशा एकूण चार रुग्णावर उपचार सुरू होते. मात्र या चार ही रुग्णांनी कोरोनावर मात करीत विजय खेचून आणला आहे.त्यामुळे या सर्वांना घरी सुट्टी देण्यात आली असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
तसेच सेनगाव येथील कोरोना केअर सेंटर येथून  खुडज येथील नऊ ,व बरडा येथील तीन असे मिळून एकूण बारा रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे.आजमितीला एकूण ४५ पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे आता केवळ ३२ कोरोनाबाधित रुग्णावर उपचार सुरू आहेत.
उपचार घेत असलेल्या रुग्णामध्ये कळमनुरी आठ, यात घोडा कामठा एक, कांडली एक, चाफनाथ तीन,आडा एक, येडसी तांडा दोन अशा आठ रुग्णांचा समावेश आहे. तर वसमत केअर सेंटर येथे एकूण बारा रुग्णावर उपचार सुरु आहेत यामध्ये हट्टा चार, गिरगाव दोन, अकोली एक, कुरुडवाडी एक, हयातनगर दोन, कौठा एक, वसमत शहर एक यांचा समावेश आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती ठणठणीत असून कोणतेही गंभीर लक्षणे नसल्याचे सांगितले जात आहे.
याशिवाय जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात उपचारसाठी दाखल करण्यात आलेल्या मध्ये सुरेंगाव तीन,
नागेशवाडी एक,समुदाय आरोग्य अधिकारी गंगानागर एक, पहेनी दोन, माझोड एक, चोंढी खुर्द एक, बाराशिव दोन, रिसाला बाजार एक, अश्या बारा कोरोना लागण झालेल्या रुग्णांचा समावेश  असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात २३६८ कोरोना बाधा झालेल्या रुग्णांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी २०५७ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. यातील २०६४  रुग्णांची प्रकृती ठणठणीत बरी झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. आजघडीला २९३ रुग्ण भरती असून २११ जणांचा अहवाल येणे बाकी असल्याचे जिल्हा शल्य चिकितस्क डॉ. कुमार प्रसाद श्रीवास यांनी सांगितले. आज पहिल्याच दिवशी ४५ रुग्ण बरे झाल्याने जिल्हा प्रशासनाला दिलासा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.