Home » माझा बीड जिल्हा » शॉक लागून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू.

शॉक लागून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू.

शॉक लागून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू

-/ केज – शरद गिराम

केज – घराच्या छतावर काही कामानिमित्त गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा छताजवळून गेलेल्या विजेच्या तारेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी ५ वाजण्याच्या सुमारास केज शहरातील बाराभाई गल्ली भागात घडली
मुलाचा कळंब तालुक्यातील बोळवटी येथील अभिषेक लहू काळे याचे वडील गेल्या काही वर्षा पूर्वी मरण पावले आहेते तेव्हा पासून अभिषेक हा आपल्या मामा कडे राहतो केज शहरातील बाराभाई गल्ली भागात तो राहत असून आज काही कामा निमित्त अभिषेक शेजारच्या घरावरील छतावर गेला असता हवा मोठ्या प्रमाणावर सुटली असता छता शेजारून गेलेल्या विजेच्या तारेला चिटकून शॉक लागून अभिषेक याचा मृत्यू झाला सदरची विजेच्या खांबावरील तार धोकादायक असल्याची माहिती वेळोवेळी वीज कंपनीच्या अधिकारी कर्मचारी यांना देण्यात येऊन ही सदरील असुरक्षित तार काढण्यात आली नव्हती या मुळे वीज कंपनीच्या विरोधात संताप व्यक्त केला जातं आहे

Leave a Reply

Your email address will not be published.