Home » महाराष्ट्र माझा » परिक्षा शुल्क माफ करा – आकाश मस्के

परिक्षा शुल्क माफ करा – आकाश मस्के

परिक्षा शुल्क माफ करा – आकाश मस्के

-/डोंगरचा राजा / आँनलाईन.

राज्य सरकारने कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमी वरती महाविद्यालयीन परिक्षा रद्द केल्या व पदवी व पदव्युत्तर अंतिम वर्षाच्या परिक्षा साठी मागील सर्व सेमिस्टर ची सरासरी करुन त्या आधारे गुणांकन करण्याचा निर्णय झाला आहे. परंतु कोणत्याही पदवी व पदव्युत्तर परिक्षा होणार नसतांना मात्र काही विद्यापीठ व महाविद्यालयांने फीस आकारणी केलेली आहे जी की नियमांना धरुन नाही. ही फीस ज्या त्या विद्यार्थ्यांना परत करावी व अश्या प्रकारची परिक्षा आकारु नये अशी मागणी शिवसंग्राम विद्यार्थी आघाडी पुणे चे शहर उपाध्यक्ष आकाश मस्के यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सावंत यांच्या कडे विद्यार्थ्यांच्या वतीने केली आहे.

सध्या कोरोना सारख्या गंभीर स्थितिमध्ये बर्याच कुटुंबाचा आर्थिक प्रश्न बिकट होत असतांना जी परिक्षा फीस परिक्षा घेण्याच्या व्यवस्थेवर होणारा खर्चासाठी आकारली जात असते परंतु अशी कोणतीच परिक्षा होणारच नसल्या मुळे अश्या प्रकारे फी आकारणी करुन गरीब व सर्वसामान्य परिस्थिती असलेल्या युवक व विद्यार्थी यांची अडचण वाढवण्याच काम होत आहे. यावर तातडीने लक्ष घालुन मंत्री महोदयांनी हा प्रकार बंद करावा अशी विनंती शिवसंग्राम विद्यार्थी आघाडी च्या वतीने आकाश मस्के पाटील यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.