Home » महाराष्ट्र माझा » स्वँब टेस्टिंग लॅब सुरू करा – देवानंद जाधव.

स्वँब टेस्टिंग लॅब सुरू करा – देवानंद जाधव.

स्वँब टेस्टिंग लॅब सुरू करा – देवानंद जाधव.

-/ संतोष मानकर – हिंगोली

महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता हिंगोली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत 171 कोरोना रुग्ण हिंगोली जिल्ह्यात आढळले आहेत.

सध्या तपासणीसाठी औरंगाबाद किंवा नांदेड या ठिकाणी पाठवले जातात. तेथील लँबमध्ये टेस्टिंगचे प्रमाण जास्त असल्यामुळे अहवाल येण्यास खूप उशीर लागत आहे.

परिणामी आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. हिंगोली जिल्ह्यातील लोकांना या संक्रमणापासून वाचविण्यासाठी तात्काळ निदान होणे आवश्यक आहे. कोरोना टेस्ट लॅब सुरू झाल्यानंतर सर्व चाचण्या हिंगोली जिल्ह्यांमध्ये होतील त्यामुळे चाचण्यांची संख्याही वाढवता येणार आहे.

हिंगोली जिल्ह्यांमध्ये कोरोना स्वँब टेस्टिंग लॅब लवकरात लवकर सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी. अशी मागणी शिवसंग्राम युवक आघाडीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष देवानंद जाधव यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.