व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक..
– खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांनी जिल्हा आरोग्य विभागाचं केलं कौतुक.
– डोंगरचा राजा / आँनलाईन.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हा आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली.कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागाने केलेले उपाययोजना व सद्यस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साधनसामुग्री बाबत माहिती घेऊन वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी यावेळी संवाद साधला.
सुरुवातीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन व आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे बीड जिल्हा कोरोनापासून सुरक्षित होता व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाय योजना देखील कौतुकास्पद होत्या.परंतु कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभाग ज्या दक्षतेने जिल्ह्याच्या आरोग्याची काळजी घेत आहे ते निश्चित अभिमानास्पद आहे.आरोग्य विभागाच्या यशस्वी उपचारामुळे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत असून आज माजलगाव तालुक्यातील तेरा कोरोना बाधित रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती बैठकीदरम्यान मिळाली,जिल्ह्याच्या दृष्टीने ही अतिशय दिलासादायक बाब आहे.
यावेळी कोरोनाचा सामना करत असताना आरोग्य विभाग व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उद्भवणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. संकटप्रसंगी ज्या समस्यांचा सामना आरोग्य विभागाला करावा लागतो आहे त्या समस्या सोडविण्यासाठी मी निश्चितपणे सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.या बैठकीचा उद्देश केवळ आढावा घेणे ऐवढाच नव्हता तर कोरोना विरुद्धच्या लढ्यात आघाडीचे सैनिक म्हणून मौलाची भूमिका पार पाडणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा,त्यांचे कौतुक करण्याचा प्रयत्न होता.