भावानेच केला भावाचा खून
-/ डोंगरचा राजा / ऑनलाइन.
दिंद्रुड येथून तीन किलोमीटर अंतर असलेल्या पिंपळगाव नाखले येथे दोन सख्ख्या भावात झालेल्या किरकोळ वादातून भावानेच भावाचा खून केला आहे.
अधिक वृत्त असे की, येथून जवळच असलेल्या माजलगाव तालुक्यातील पिंपळगाव नाखले या गावात राहत असलेल्या काळे कुटुंबातील गजानन दशरथ काळे व लक्ष्मण दशरथ काळे या भावा- भावात दारूच्या नशेत नेहमीच भांडणे होत असत!काल शनिवार दिनांक 30 रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास दारूच्या नशेत कुरबूर होऊन त्याचे भांडणात रुपांतर होत लक्ष्मण चा खून झाला. त्यांच्या आईच्या खबरी वरून दिंद्रुड पोलीस यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. आरोपीला ताब्यात घेऊन काळेच्या आईच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला सदर घटनेच्या गुन्ह्याची नोंद चालू आहे.