Home » माझी वडवणी » हल्ले सहन केले जाणार नाहीत – तांगडे.

हल्ले सहन केले जाणार नाहीत – तांगडे.

हल्ले सहन केले जाणार नाहीत – तांगडे.

-/ डोंगरचा राजा / ऑनलाइन.

– “कोरोना”च्या आडून ब्रम्हगाव,ता.गेवराई येथील दलित युवकावर जीवघेणा हल्ला.
*अशा फालतू कारणाने दलितांवर झालेले हल्ले सहन केले जाणार नाहीत.:-किशन तांगडे

बीड – दि.26 मे रोजी ब्रम्हगाव,ता.गेवराई येथील मोल मजुरी करून आपला उदर निर्वाह करणारा शिवराम बबन निकाळजे या बावीस वर्षाच्या दलित युवकांवर आणि त्याच्या कुठूम्बा वर गावातीलच गावगुंडांनी आमचा मुलगा पुण्या वरून आला आहे,हि माहिती (कोरोना चे भूत/संशय)तुम्ही गावात सांगून आमची बदनामी केली आहे,फक्त या संशया वरून आणि मनात राग धरून काठ्या,कुऱ्हाडीने जीवघेणा असा प्राणघातक हल्ला करून त्याला जबर जखमी केले,आणि त्याचा भाऊ सागर बबन निकाळजे,आई-वडील यांना देखील जबर मारहाण केली.
….शिवरामला गंभीर जखम झाल्याने व अस्वस्थ वाटू लागल्या कारणाने त्याला ताबडतोब बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
:::- अशा या गंभीर स्वरूपाचा झालेल्या हल्ल्या मुळे तेथील निकाळजे कुठूम्ब आणि तेथील दलित समाज पूर्णतः भयभीत झाल्या कारणाने त्यांनी ताबडतोब हि माहिती किशन तांगडे यांना देऊन मदत करण्याची मागणी केली.
::–कुठला हि विलंब न करता किशन तांगडे यांनी दि.27 मे रोजी अत्याचार पीडित कुठूम्बाची भेट घेऊन त्यांना धिर दिला. आणि दुसऱ्या दिवशी दि.28 मे ला पीडित कुठूम्बास सोबत घेऊन जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक हर्ष जी पोद्दार साहेब यांची भेट घेण्यासाठी SP ऑफिस गाठले ते ऑफिस ला नसल्या कारणाने किशन तांगडे यांनी त्यांना या प्रकरणाची फोन वरून सविस्तर कल्पना दिली……
::–नंतर गुन्हेगारांचा कर्दनकाळ आणि अतिशय कर्तव्यदक्ष असणारे अप्पर पोलीस अधीक्षक विजयजी कबाडे साहेब यांची भेट घेऊन त्यांच्या पुढे झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला.
…त्यांनी लागलीच गंभीर दखल घेत आपल्या यंत्रणेला आदेशीत करून गुन्हा नोंद करून घेण्याचे सांगितले.
::::आणि 324,323,504,506,34आणि अट्रोसिटी ज अंतर्गत 3(1)(r),3(1)(s)गुन्हा नोंद झाला…
—आपल्यावर गुन्हा नोंद झाल्याची माहिती आरोपीला मिळताच त्यांनी देखील पीडितावर गुन्हा दाखल केला.
……आरोपीने देखील अत्याचार ग्रस्त कुठूम्बा वर गुन्हा नोंद केल्या कारणाने किशन तांगडे यांनी चकलांबा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देशमुख आणि dysp स्वप्नील राठोड साहेब यांना फोन करून हा गुन्हा पाठीमागे घ्यावा आणि अत्याचारित कुठूम्बास न्याय दयावा अशी मागणी केली.
यावेळी खळेगाव चे सरपंच दादासाहेब निकाळजे,बबन वामन निकाळजे,सौ.रुख्मिन बबन निकाळजे इत्यादी सह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.