साहेबांनी,सायकलवर प्रचार केला..
-/डोंगरचा राजा / आँनलाईन.
– स्व.गोपीनाथ मुंडे साहेबानी, सायकलवर प्रचार केला ,,, ओढयाला रिटयाने कपडे धुतले ,?1979
– आपणा सर्वांच दैवत , स्व , साहेबांनी आयुष्यात कसा संघर्ष केला ? आणि दिवश काढले ?हे पुर्वीच्या लोकांना माहित असले तरी नव्या पिढीला माहितच आहे अस नाही ?आज ऐकूण , वाचून कुणाचा विश्वास बसणार नाही , पण हे खर आहे कि या माणसान खुपच कठोर परिभ्रम , संघर्ष केला , 1979 साली साहेबांनी स्वःता घोषणा जाहिर केली होती , ” इडा पिडा टळो , बळी राजाच राज्य येवो , लोकसभा तोंडावर असताना कुंडलिक दानवेचा प्रचारा साठी ते परळी ते चकलांबा गावात आले होते , भगवान गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात, त्यांचा मुक्काम होता , त्या वेळी प्रवासात ओढयाला अंघोळ करुन , साबन नसल्याने स्वःताची कपडे ,, रिटा ,,, (पुर्वीचा काळात कपडे धुण्यासाठी लोक वापरायाचे ) धुतले ,,, या इतिहासाचे साक्षीदार रामराव खेडकर हा सारा प्रसंग सांगत होते ,?
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
पूर्वीच्या काळात जे महान नेते होऊन गेले .ज्यांनी समाजाच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य वेचलं ,अशा लोकांच्या पाठीमागे वळून जर पाहिलं. तर पहाडासारखा संघर्ष त्यांनी निश्चित केलेला आहे. मुंडे साहेबांची उद्या पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने अनेकांच्या आठवणी, आणि प्रसंग, लोक आता बोलून दाखवू लागले आहेत,? खरं म्हणजे अलीकडच्या पिढीत लोकांना गोपीनाथराव माहित आहेत .पण त्यांनी आयुष्यात कशाप्रकारे संघर्ष केला ?यासाठी इतिहासाची पाने चाळावी लागतात. मग कुठे नव्या लोकांना साहेबांचे अनेक गुण पैलू माहिती होतात, खरं म्हणजे अशीच एक ओळख ,आणि प्रसंग, सांगताना त्यांचे कडवे भक्त रामराव खेडकर. हे हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील आहेत, तिंतरवणी त्यांचं गाव. 1979 सालात आपलं राज्य याव हे स्वप्न मुंडे साहेबांनी त्या काळात पाहिल होत . त्यांनी एक घोषणा पण दिली ॥ इडा पिडा टळो, आणि बळीच राज्य यावे .असं म्हणत लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असताना ,जालना लोकसभा मतदारसंघातून पुंडलिक हरी दानवे हे निवडणूक लढणार होते, त्यासाठी मुंडे साहेबांनी परळीहून चकलांबा तालुका गेवराई असा सायकलवर प्रवास केला होता , .आश्चर्य म्हणजे एकटेच या भागातील लिमगाव ,पारगाव, तरडगव्हाण, चकलंबा, आधी परिसरात त्यांनी दोन दिवस तळ ठोकून लोकांना आवाहन केले, खेडकर बोलताना म्हणाले की साहेबांच्या गळ्यात शबनम होती,? सायकल ला स्पीकर आणि भोंगा लावलेला होता. तिंतरवणी च्या बाजारात त्यांचे भाषण सुरू होतं, त्या दरम्यान दोन दारुड्यांनी भाषणात गोंधळ घातला. म्हणून माझी आणि साहेबांची ओळख झाली, बाबुराव खेडकर हे रामराव चे वडील .आपला मुलगा आहे म्हणून त्यांनी साहेबांना घरी आणले ,आणि रामराव च्या घरी 2 दिवस त्यांनी मुक्काम केला, दरम्यानच्या काळात भगवान गडावर जाऊन दर्शन घेतलं . परिसरातल्या गावात प्रचारा साठी जाताना त्याकाळात एका ओढ्याला पाणी वाहत होते. तिथेच स्नान केले, आणि स्वतःचे कपडे स्वतः धुतले. साबण नव्हती. मात्र पूर्वीच्या काळात रिट्या च्या झाडाच्या बिया याचा फेस व्हायचा आणि लोक त्याच्यापासून कपडे धुवायचे ,त्याचा वापर करत मुंडे साहेबांनी कपडे धुतले .आणि ही नवीन माहिती सोबत च्या लोकांना दिली . शेळके मामा ,नागरगोजे हे काही सहकारी सोबत होते, खरंतर जेवणासाठी त्यांना बाजरीची .भाकरी, बेसन .आणि वांग्याची भाजी. आवडायची .हातावर भाकरी घेऊन वड्यावर जेवल्याच खेडकर यांनी सांगितलं. त्या दरम्यान त्यांनी 6 गावात जाऊन दानवे यांचा प्रचार केला. याठिकाणी रामराव खेडकर यांनी एक गोष्ट जाणीवपूर्वक सांगितली ,ज्यावेळी मुंडे साहेब राज्यात उपमुख्यमंत्री झाले. त्याकाळात त्यांनी आम्हाला मुंबईला बोलावून घेतले. जे लोक 1979 ला दोन दिवस सोबत होते, त्या सर्वांना 11 विहिरी आम्हाला भेट दिल्या, हा प्रसंग खरंतर फार मोठा, उत्तरदायित्वाचा होता, तात्पर्य अस आहे की पूर्वीची आठवण लक्षात ठेवून. कार्यकर्त्यासाठी जीवाचं रान करणारा हा नेता नव्या पिढीतल्या लोकांना कळावा म्हणून हा लिहिण्याचा मी उठाठेव केला, खरंच मुंडे साहेब हे हे देवच होते, त्यांच्या अंगी दैवत्वाची प्रचिती होती. म्हणून आजही जुन्या लोकांना सहकाऱ्यांना त्यांच्या सोबतचे सारे प्रसंग आठवतात. मग डोळ्यातले अश्रू रोखल्या जात नाहीत ,आज पुण्यतिथीच्या निमित्ताने प्रेम करणारे लाखो अनुयायी उद्याचा तीन जून चा सूर्य उगवायला नको अशीच अपेक्षा करतात ,आणि जर अशाप्रकारचं दुःख अनुयायांना होत असेल,? तर मग रक्ताच्या नात्यातील लोकांच्या दुःखांचा विचार करायलाच नको?,,,,,,,,,,,
राम कुलकर्णी
9422742577