जमतोय रोज तिनशे माणसांचा जमाव – अँड.अजित देशमुख.
– डोंगरचा राजा / आँनलाईन.
– तांदळवाडी घाट इथल्या तलावात मासेमारी साठी जमतोय रोज तिनशे माणसांचा जमाव..
– एसडीओंनी जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल केली ?
बीड – अवैध मासेमारी, वीज चोरी, पाणी उपसा, माती-रेती-मुरूम उपसा, तिनशे लोकांचा जमाव, सोशल डिस्टनसिंग चा फज्जा, जमावबंदी आणि संचारबंदी आदेशाचे उल्लंघन अशा अनेक घटना केवळ एक गाव तांदळवाडी घाट ता. बीड येथे घडत आहेत. याबाबत आम्हास तक्रार प्राप्त झाली. यानंतर जिल्हाधिकारी यांनी पथक रवाना केले. मात्र या पथकाने कोणतीच कारवाई न करता काढता पाय घेतला. कोरोना सदृश्य परिस्थिती हा प्रकार योग्य नसल्याने आता एससडीओ टिळेकर यांच्या नाराजीने आंदोलन करणार असल्याची माहिती जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचेकडे तक्रार दिल्यानंतर त्यांनी ठोस भूमिका घेत दोन पथक दोन बाजूने पाठविले. विशेष म्हणजे एसडिओ तांदळवाडी येथील तलावाजवळ गेले. त्यांची गाडी पाहून जमाव दूर गेला. गाडी परत फिरली अन जमाव दुपटीने वाढला. यावेळी तहसीलदार देखील दुसऱ्या गाडीत असल्याचे समजते.
याबाबत टिळेकर यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी “सर्व संबंधित यंत्रणांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत.” असे सांगून कोणतीही कारवाई न करता विषय त्यांच्या पातळीवर संपवला आहे. अशाने विषय संपत नसतो. या जमावात मुंबई आणि पुणे येथून आलेले लोक देखील समाविष्ट असल्याची तक्रार असल्याने विषय गांभीर्याने घेणे गरजेचे होते. मात्र असे उत्तर दिले गेले.
तलाव परिसर हा जिल्हाधिकारी यांनी बफर झोन घोषित केलेल्या साखरे बोरगावच्या शिवेला लागून आहे. या तलावात विजचे आकडे टाकून करंट देऊन मासे मारले गेल्याने लाखावर मासे मरून पडले आहेत. या माशांची काही टनावर दररोज विक्री केली जात आहे. यातून परिसरातील जवळपास पंचवीस गावांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
आकडे टाकून वीज घेऊन तलावातील पाणी उपसले गेले आहे. अनेकांनी वेगवेगळ्या प्रशासनाकडे याबाबत वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र दखल घेतली गेली नाही. एकीकडे कोरोनाने थैमान घातल्यानंतर सर्वच आदेशाचे उल्लंघन करून असे कृत्य केले जात असेल तर ते योग्य नाही. विशेष बाब म्हणजे या जमावाचे नेतृत्व करणाऱ्यांच्या दहशतीखाली लोक बोलायला तयार नसल्याचे देखील कळत आहे.
टिळेकर यांच्यासह तहसीलदार हेही तिथे गेल्याचे समजते. सर्व मुद्दे त्यांनी पाहिले. आमच्याशी झालेल्या चर्चे दरम्यान मान्यही केले. मात्र कारवाई केली नाही. यात जन आंदोलन आता आंदोलनाची भूमिका घेणार असून इथली परिस्थिती तात्काळ सुधारून जमाव जमला की त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. अन्य कारवाया तात्काळ कराव्यात. अन्यथा बिघडलेल्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार असेल, असेही अँड. देशमुख यांनी म्हंटले आहे.