Home » महाराष्ट्र माझा » नागपूर मध्ये ‘तुकाराम मुंढे पॅटर्न’

नागपूर मध्ये ‘तुकाराम मुंढे पॅटर्न’

नागपूर मध्ये ‘तुकाराम मुंढे पॅटर्न’

-/डोंगरचा राजा / आँनलाईन.

– कठोर निर्णय;धडक अंमलबजावणी’

नागपूर महानगरपालिकेची सूत्रे हातात घेणे आणि एक दीड महिन्याच्या कालावधीत कोरोनाची एन्ट्री होणे, त्याचा सामना करणे हे मोठे आव्हान होते. तत्परतेने काही कठोर निर्णय घ्यावे लागले. तेव्हा या निर्णयाला विरोध झाला मात्र तेच निर्णय आज नागपूरसाठी तारणहार ठरलेत. संपूर्ण देशातील महत्त्वाच्या शहरांशी तुलना केली असता नागपुरातील रुग्णसंख्या कमी, ऍक्टिव्ह प्रकरणे प्रत्येक दिवसाला कमी होत जाणे, मृत्युदर अत्यंत कमी, बरे होणाऱ्याची आणि अहवाल निगेटिव्ह येणाऱ्याची संख्या अधिक, जे पॉझिटिव्ह अहवाल येत आहेत ते विलगीकरण कक्षात असलेल्यांचेच येणे, त्यामुळे समूह संसर्गाचा टळलेला धोका हे सारे शक्य झाले. कुणी या निर्णयांना ‘नागपूर पॅटर्न’ म्हटले तर कुणी त्याला ‘तुकाराम मुंढे पॅटर्न’ अशी उपमा दिली.
या शहराच्या नागरिकांचे सुदृढ आरोग्य आणि शहराचा विकास या बाबींवर मनपाचा फोकस आहे. त्यादृष्टीने मनपाचा प्रवास सुरु आहे. याच दृष्टीने निर्णय घेण्यात येत आहे. निर्णयांची अंमलबजावणी आणि नागरिकांचे सहकार्य यातच निर्णयांच्या यशस्वितेचे गुपित दडले आहे.
ज्या-ज्या ठिकाणी नागरिकांचे सहकार्य मिळाले त्या-त्या ठिकाणी कोरोनावर नियंत्रण मिळविता आले. जेथे नागरिकांचा थोडा विरोध झाला तेथे थोडा त्रास झाला. तेथे वेगळ्या पद्धतीने नियंत्रण मिळवावे लागले. भविष्यात सर्वात पहिले कोरोनामुक्त होणाऱ्या शहरामध्ये नागपूरचे नाव असावे हा नागपूर मनपाचा प्रयत्न आहे. त्यासाठी नागरिकांनी पूर्णपणे सहकार्य करावे. नागरिकांची सुरक्षितता आणि शहराचे निरोगी आरोग्य हीच आपली प्राथमिकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.