सकारात्मकने सामना करा – अँड. अजित देशमुख.
-/डोंगरचा राजा / आँनलाईन.
बीड – कोरोनाला न घाबरता त्याच्याकडे सकारात्मक नजरेने पाहून, आवश्यक असलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजना कोणत्या याकडे लक्ष द्या. कोरोना पासून आपण कसे सुरक्षित आहोत, याकडे लक्ष दिले तर भयभीत झालेला समाज शांत होईल. त्यामुळे कोराणाला न घाबरता नियम पाळा आणि शांत रहा, असे आवाहन जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित देशमुख यांनी केले आहे.
सदय परिस्थितीत जनतेमध्ये कोरणा हा एकच विषय चर्चेला आहे. यावर चर्चा होणे सहाजिक आहे. मात्र सकारात्मक चर्चेपेक्षा नकारात्मक चर्चा जात होऊन जास्त होत असल्याने समाज भयभीत होत आहे.
आपण कोणती बंधने पाळायची, नियम काय सांगतात, जिल्हा प्रशासनाचे आदेश काय आहेत आणि कोरोना रोखण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, या बाबींची आपण दक्षता घेतली तर कोरोना आपल्या जवळ येऊ शकत नाही. मात्र यावर सकारात्मक नजरेने कमी आणि नकारात्मक नजरेतून जास्त चर्चा होत असल्याने सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे.
आपले गाव सोडून नोकरी अथवा व्यवसायाच्या उद्देशाने लोक पुणे-मुंबई अथवा महाराष्ट्रातील काना कोपऱ्यात सह देश आणि विदेशात गेले. मात्र यात त्यांची काहीही चूक नाही. देशात कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर हे लोक आपापल्या गावात परत येत आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही. कारण आलेले हे सर्व आपलेच बांधव आहेत.
कोरोना महाभारी अथवा त्यापासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबी यावर आतापर्यंत प्रदीर्घकाळ चर्चा झालेली आहे. त्यामुळे जे कोणी परगावी गेलेले होते, ते आपल्या गावात अथवा शहरात परत आल्यानंतर त्या आलेल्या व्यक्तीसह त्या कुटुंबाने नियमाचे पालन करून दक्षता घेतली तर कोणतीही अडचण वाढणार नाही.
जे कोणी बाहेरून आलेले आहेत त्यांनी आपली रितसर तपासणी तात्काळ करून घेणे, तपासणीनंतर निगेटिव्ह आले तरी शासन आदेशाप्रमाणे होम क्वारंटाईन होणे आणि आपल्या भागातील कोणालाही आपल्या पासून त्रास होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. ही दक्षता घेतली गेली तर समाजाला कोणतीही भीती नाही.
मात्र होम क्वारंटाईन केलेले लोक गावभर फिरत असतील तर हे चुकीचे आहे. या लोकांपैकी एक टक्का, दोन टक्के देखील लोकांना कोरोना नाही. हे निश्चित असले तरी देखील प्राप्त परिस्थितीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन केले आणि क्वारंटाईन राहिले, तरच महामारीचा उद्रेक होणार नाही.
असे असतानाही क्वारंटाईन केलेले काही लोक गावभर फिरत आहेत. ही बाब चुकीची असून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने जी यंत्रणा कामाला लावली आहे, ती यंत्रणा झोपली आहे का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. या लावलेल्या यंत्रणेने या महामारीच्या काळात तरी पगार आपण घेत असल्याने जनतेची सेवा करणे, हे आपले कर्तव्य आहे, हे विसरून चालणार नाही.
याउपर जर नियंत्रण ठेवणारे हे लोक जर व्यवस्थित नियंत्रण ठेवत नसतील तर त्यांच्या तक्रारी सुजाण नागरिकांनी, एक जागरूक नागरिक म्हणून प्रशासनाकडे तात्काळ नोंदणी आवश्यक आहे. यामुळे आपल्या भागाची सुरक्षितता वाढणार आहे. त्यामुळे कोरोना महामारीला न घाबरता नियमाचे पालन करून आपापल्या घरात थांबा आणि महामारी पासून दूर राहा, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.