Home » महाराष्ट्र माझा » सरपंचांना विमा संरक्षण द्यावे – सुरेश चाळक 

सरपंचांना विमा संरक्षण द्यावे – सुरेश चाळक 

सरपंचांना विमा संरक्षण द्यावे – सुरेश चाळक 

-/ डोंगरचा राजा / आँनलाईन.

– कोरोना शी लढणारे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना शासनाने विमा संरक्षण द्यावे – सुरेश चाळक पाटील

वडवणी – भारत देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाशी सामना करत असून गाव पातळीवर या रोगाच्या बचावासाठी गावचे सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य रात्रंदिवस झटत आहेत. मात्र त्यांच्या साठी विमा संरक्षण नाही. शासनाने त्यांना विमासंरक्षण द्यावे अशी मागणी चिंचवडगाव येथील युवा नेते सुरेश आबा चाळक पाटील यांनी केली आहे.

सध्या 21व्या शतकात जागतिक संकट म्हणून कोरोनाचं संकट आहे. या रोगांची उत्पत्ती बाहेर देशात मध्ये झाली असून ग्रामीण भागामध्ये या रोगाचा अत्यंत विपरीत परिणाम दिसून येत आहेत. महत्वाचे म्हणजे गावातील युवापिढी ही शांत बसत नाही. अचानक गावात प्रवेश करून इतरांनाही त्याचा प्रादुर्भाव होईल असे गैरवर्तन करतात. त्यातून सरपंच, उपसरपंच यांना वेळोवेळी वाद विवादाचा सामना करावा लागतो. यामुळे सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या जीवावर बेतू शकते. या उलट मात्र गाव पातळीवर ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, मदतनीस,ताई, आशा वर्कर, संगणक परिचालक यांना प्रत्येकी रुपये 25 लक्ष विमासंरक्षण रक्कम शासनाने घोषित केली आहे.

तरी सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना शासनाने तातडीने विमासंरक्षण रक्कम घोषित करून भयमुक्त करावे. अशी मागणी तालुक्यातील सर्व सरपंच, लोकप्रतिनिधींच्या वतीने सुरेश आबा मित्र मंडळाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.