Home » मनोरंजन » लाॅकडाऊनच्या काळात अनोखा उपक्रम..

लाॅकडाऊनच्या काळात अनोखा उपक्रम..

लाॅकडाऊनच्या काळात अनोखा उपक्रम..

-/डोंगरचा राजा / आँनलाईन.

आताच्या लाॅकडाऊनच्या काळात कल्याण जि.ठाणे येथील लेखिका/कवयित्री सौ .अनिता कळसकर यांनी त्यांच्या शब्दसुमने नावाच्या वाॅटस अपच्या माध्यमातून ११ ते १५मे पर्यंत राज्यस्तरीय भव्य अभिवाचन स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन/नियोजन केले होते.साहित्यिक परिवाराला एक घरबसला कोणत्याही पुस्तकातील ५ते१०मिनिटांचा उतारा ऑडियो स्वरूपात मागविला होता .जवळपास महाराष्ट्रातील ६५साहित्यिक तसेच विद्यार्थी वर्गाने पण या उपक्रमात सहभागी ता दर्शवली. महाराष्ट्र साहित्य परिषद कल्याण‌ शाखेचे कार्याध्यक्ष तसेच माजी.अध्यक्ष अखिल भारतीय नाट्य परिषद कल्याण शाखा .मा.श्री भिकू बारस्कर यांनी पारदर्शकता ठेवून अतिशय जबाबदारीने या पहिल्याच ऑनलाईन अभिवाचनाचे परिक्षण केले.
त्याबद्दल सरांचे खुप खुप धन्यवाद व आभार समूह संचालक सौ अनिता कळसकर यांनी केले .तसेच सर्व विजेत्यांचे व सहभागी साहित्यिक यांचेही अभिनंदन केले.सर्वांना सुबक अशी प्रमाणपत्रे ऑनलाईन दिली गेली.यात प्रथम क्रमांक मुंबई च्या दीपाली पाटील यांना मिळाला..तसेच द्वितीय क्रमांक दर्शाना मुरांजन यांनी पटकावलआ.तसेच परिक्षक पुरस्कृत म्हणून वर्षा फटकाळे, शशिकला सुराणा आणि मुरबाडची दहावीची मुलगी तृप्ती संतोष सुरासे हिला मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published.