Home » माझा बीड जिल्हा » बीडची कन्या..कोरोना योद्धा.

बीडची कन्या..कोरोना योद्धा.

बीडची कन्या..कोरोना योद्धा.

-/डोंगरचा राजा / आँनलाईन.

बीड – नऊ महिन्याच्या बाळाला घरी ठेवुन मुंबईतील करोनाग्रस्तांनसाठी आरोग्यसेवा देणा-या सौ. अनुराधा ठोंबरे – फड या बीड जिल्ह्याच्या भुमीकन्येला बीडकरांचा मानाचा सलाम.

बीड जिल्ह्यातील दहिफळ (वडमाऊली) येथील पत्रकार लक्ष्मण ठोंबरे यांची कन्या अनुराधा ठोंबरे – फड ह्या आपल्या आवघ्या नऊ महिन्याच्या बाळाला घरी ठेवून …मिरा भाईंदर महानगरपालिका येथील भारतरत्न पंडित भिमसेन जोशी या कोविड- १९ हॉस्पिटलमध्ये गेल्या अडिच महिन्यापासून करोनाग्रस्तांची अविरत आरोग्य सेवा करीत आहेत. हि सेवा करित असताना अनुराधा ठोंबरे यांना आपल्या नऊ महिन्याच्या छोटया बाळासाठी मात्र खुप कमी वेळ मिळतो. मायेच्या ममतेला दुर करून आई – वडिलांनी समाजसेवेची दिलेली शिकवण त्या या आरोग्य सेवेतुन पार पाडत आहेत. अशा बीडच्या भुमीकन्येचा बीडकरांना सार्थ अभिमान आहे.

– शासनाच्या नियमांचे पालन करा.

” माझ्या अवघ्या नऊ महिन्याच्या बाळाला घरी ठेवुन ड्युटिवर जाताना माझ मन खुप भरून येत कारण एक आई म्हणून मी तिला वेळ देवु शकत नाही .पण आपण समाजासाठी चांगले कार्य करित आहोत याच समाधान वाटत ..कारण आरोग्यसेविकेच उत्तम आरोग्यसेवा देण हेच एक व्रत असते . तसेच या कोरोनांतुन बरे झालेल्या लोकांचे आशिर्वाद माझ्या बाळाला नक्कीच मिळतील अशी भावना अनुराधा ठोंबरे – फड यांनी व्यक्त केली.
या सोबतच लोकांनी घाबरून न जाता कोरोनाशी लढा द्यावा , काळजी घ्या आणि शासनाच्या नियमांचे पालन करावे असा संदेश त्यांनी दिला आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published.