Home » महाराष्ट्र माझा » नाभिक बांधवांनो..जय संतसेना.

नाभिक बांधवांनो..जय संतसेना.

नाभिक बांधवांनो..जय संतसेना.

-/ डोंगरचा राजा / आँनलाईन.

सर्व सलुनधारक बंधुंनो सावधान…!
” आता आपली सलुनची दुकाने सुरु होत आहेत. शासनाने आरोग्यखाते,पोलिस खाते, यांना जसे 20लाख,50लाख विमा पॕकेज या नोकरदाराना दिले आहे (यांना शासनाचा पगार असताना)पण तसे पॕकेज आपणांस अजिबात जाहिर केलेले नाही .
यास आपण सर्वजन जबाबदार आहोत ईतर संघटने प्रमाने आपण योग्यवेळी एका छत्राखाली एकत्र येत नाहीत.जो- तो नेताही फक्त आपले ईप्सीत साधत आसतात . आपला वापर निवडनुकित मतापुरताच करुन घेतला जातो.
आज मात्र एकही नेता VDO कॉन्फर्नस,online बातम्या वगैरे देताना दिसत नाहीत.माझ्या समाज बांधवास, विमाकवच मीळाले पाहीजे ,दुकाने शासनाने सॕनिटायझर करुन दिली पाहिजेत . तीन महिने होत आहेत दुकाने बंद आसुन प्रत्येकी प्रतिमहिना पाच – दहा हजार आनुदान मीळाले पाहीजे,दुकाने किरायानी केलेली आहेत किमान किराया माफीसाठीचा आदेश काढून परस्पर दुकान मालकाला पेड झाला पाहिजे आसे कोणतेही ध्येय धोरने शासनाकडून राबऊन घेण्यासाठी आपले नेते प्रयत्न करताना दिसुन येत नाहीत .
जर — तर व्यावसाय करताना कोणी दगावले तर कुटुंबाचे काय?यासाठी शासनाच्या जवळचे कोणीही नेते नाहीत…कि जे शासन दरबारी भांडून विमाकवच मीळवतील….! , मदत मीळुन देतील…! ! म्हणुन माझ्या नाभिक बांधवांनो…
तेव्हा आपणांस आपला जीव धोक्यात घालुन ‘ आल्प दरात ‘ समाजसेवा करावयाची आहे.तेव्हा सलून चालू केल्यावर खालील गोष्टीची दखल ,दक्षता व काळजी घेणे हे आपल्या व कुटुंबाच्या हिताचे आहे ‘ आप भला तर जग भला’ आसे मला वाटते.”
“तेव्हा…तेव्हा…तेव्हा…
बंधुंनो…! येणारे दिवस.. रात्र आपल्यासाठी फारच वाईट आहे .
खरच सावधान…!”
खरच मनापासुन सांगतोय सावधान…! !
1) आपणाकडे येणाऱ्या ग्राहकांचीपूर्ण माहिती आपल्याला हवी व notbook मध्ये नोंद करुन घ्यावी. ज्यामध्ये नाव, गाव , मोबाल नं ,व ईतर आवश्यक माहिती आसेल.
2) दुकानात ग्राहकाला येण्या आधी सर्दी ताप खोकला तर नाही ना आशी खात्री करून घेऊनच प्रवेश द्यावा.
3) बळजबरीने दुकानात ग्राहक प्रवेश करत आसेल तर जवळच्या पोलिस स्टेशनचा नं जवळ ठेवा व तसे तात्काळ कळविने आवश्यक .
4) दुकानाच्या प्रवेश दाराजवळच साबण किव्हा हँडवश , सॅनिटाईझर ,पाणी ठेवा व त्यांना हात स्वच्छ धुऊन येण्यासाठी सुचना करा.
5) जर दोन किंवा दोनपेक्षा अधिक चेअर असतील तर दोन्ही खुर्चीत अंतर ठेवून काम करावे. 6) दुकानात एका वेळेस खुर्ची प्रमाणे एकाच ग्राहक राहील वेटिंगला बसवू नये, 7) आपले मोबाईल नं दुकाना समोर नोंद करावेत म्हणजे फोन करुन ते आपले नाव नोःदवतील व आपणांसही संपर्क करणे सुलभ होईल.ग्राहकांना वेटिंग करावी लागणार नाही.व संपर्क कमी होईल.
8) फोन करुन घरी बोलावले तरी शक्यतो टाळा. घरी जाऊन सेवा दिल्यास दर दुप्पट घ्यावेत.
9) आपण मास्क लावने बंधनकारक आहे व मास्क नसलेल्या ग्राहकाची कटिंग करने टाळावे. विनामास्क सेवा दिल्यास पैसे मीळतीलही पण विषाणुजन्य रोगाने ग्रासले तर जीवन परत मीळनार नाही..
10) आपण आपल्या कुटुंबाचे प्रमुख आहात.आपले ” जिवीत आसने ” हेच सर्वांत मोठे गिप्ट आहे.त्यामुळे आपण हँड ग्लोझ व मास्क – शूज सॉक्स व दुकानातील ड्रेश पण वेगळा वापरणे बंधनकारक आहे. 11) ग्राहकाला वापरावयाचा टॉवेल एका ग्राहकाला एकच वापरा किंवा ग्राहकाला आणायला सांगने अधिक चांगले व ग्राहकांच्याही हिताचे आसेल. 12) आपल्या समोरील प्रत्येक ग्राहकांची कटिंग दाडी झाल्यावर साहित्य, काउंटर खुर्ची, डेटॉल ने पसून घ्यावी हे सगळं सॅनिटाईझर केले तरी चांगले ठरेल .
13) आपले दुकानातील आवश्यक तेवढेच साहित्य वर टेबलवर काउंटरवर ठेवा.
14) शक्यतो सेविंग व दाढीला कट मारताना झिरो मशीनचाच वापर करने ईष्ट पण ग्राहकांच्या ईच्छेप्रमाने निर्णय घ्यावा लागेल नाही का?
15) मशीनची क्लिप वारंवार डेटाॕलने साफ करावी.
16) आपल्याला अतिरीक्त येणार खर्च आणि वेळे अभावीहोणार तोटा लक्षात घेता रेट वाढवून घ्या . कमी दरात काम केल्यामुळेच आपण पुढे गेलेलो नाहीत आहे तेथेच आहोत.कमी दर घेऊन जर 20 ग्राहक झाले तर अधिक दर घेऊन 14- 15 झालेतरी चालतील ना हेही गणित जरा समजुन घेणे आज आवश्यक आहे.
17) आपल्या हाताला दर10 मिनिटाला सॅनिटाईझर लावावे.
18) दुकाना मधल्या वेळेत नाक,डोळे,तोंड यांना आजिबात स्पर्श करू नका. 19) घरी गेल्यावर इकडे तिकडे कसलाही स्पर्श न करता बाथरूम मध्ये जा व अंगावरील कपडे वॉशिंग पावडर किंवा डेटाॕल मध्ये भिजत घालून ठेवा, 20) घरी गेल्यावर लहान बाळांना जवळ घेऊ नका लांब ठेवा,
21) आपल्याला जरी सलून चालू करण्याची परवानगी मिळाली आसली तरीआपल्याला कुटुंबाला व ग्रहाकाला धोका च आहे म्हणून वरील सूचनांचे पालन करताना हलगर्जीपना करू नका, 22) काम करतांना शक्यतो फोनचा वापर करू नका आपल्या हाताचा स्पर्श फोनला जास्त प्रमाणात होईल शक्यतो हेड फोन वापरा घरी जाताना फोन सॅनिटाईझर ने किव्हा डेटॉल ने पुसून घ्या.
23) ग्राहकांचे पैसे घेताना शक्यतो ऑनलाईन गूगल पे ,फोन पे चा वापर करा.नोटा दिल्यास सॅनिटाईझर करून मगच गल्ल्यात ठेवा खिशात लगेच ठेवू नका.

24) मा.जिल्हाअधिकारी यांनी घालुन दिलेल्या नियमानुसार दुकाने चालू राहतील,कोणीही नियमच उल्लंघन केल्यास कारवाई झाली तर स्वतः जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी.

“शासन आपल्या व्यावसायाला हिनलेखत आहे याची प्रचिती परवाच्या निर्णयावरुन कळुन चुकली आहे.
कायतर म्हणे सलुनला परवानगी पण ज्यांच्या त्यांच्या घरी जाऊन केली पाहिजे…!
किती हा तुघलकी निर्णय …!
आपण 21व्या शतकात आहोत हे शासन विसरलेले दिसतेय. आणि आपले काही बांधव लागले लगेच दारोदार फिरायला…!
ठिकय ज्यांच्याकडे दुकान नाही, अद्यावत साहित्य नाही,आधुनिकता नाही त्यांच्याकडे जानारे ग्राहकही याच लेवलचे आसते.किमान सुज्ञास अधिक सांगने नकोय.तरी ही हे थांबने काळाची गरज होती .या फुठीरतेमुळेच शासन आपली दखल घेत नाही.एक वज्रमुठ असेल आणि त्यावर कितीही घाव घालण्याचा प्रयत्न झाला तर ती अभेद्य असेल आशावेळी शासनही लवचिकता घेत असते.आपण पूर्णतः गटातटात विभागलोय हे थांबने काळाची गरज आहे. आहो जरा आजुबाजुला पहा पोटात अन्नाचा कनही नसताना काही लोक एका छत्राखाली येऊन शक्तीप्रदर्शन करुन मागन्या मंजुर करन्यास भाग पाडतात.इथे मात्र समाज मुटभर आणि संघटना 1760….! ! यामुळे आपण आजुनही दुर्लक्षितच आहोत…!
सुज्ञ समाज बांधवांनो खरच विचारच करा….! ! ”
आपलाच संकलक
हितचिंतक नाभिक बांधव
राऊत डी.डी.
वडवणी जि.बीड
9421351041

Leave a Reply

Your email address will not be published.