आसद अलीचा पहिला रोजा.
-/डोंगरचा राजा / आँनलाईन.
किल्लेधारूर – येथील बाराभाई गल्ली भागात राहणाऱ्या आसदअली या आठ वर्षाच्या बालकाने पवित्र रमजान महिन्यात आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पुर्ण केल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
इस्लाम धर्मात रमजान महिना अति पवित्र आहे. या महिन्यात इस्लामची मुख्य मुलतत्वापैकी एक रोजा हा सर्वजन ठेवतात. वयाच्या सातव्या वर्षापासून वयस्कर व सुदृढ स्त्री पुरुषांना नमाज प्रमाणे रोजा अनिवार्य आहे. पवित्र रमजानच्या रोजा (उपवास) ठेवणे सध्या अंतिम चरणात आहेत. रोजा पहाटे पासुन सुर्यास्तापर्यंत जवळजवळ १४ तास अन्न व पाणी वज्र करुन यशस्वी केला जातो. शहरातील बाराभाई गल्ली भागात राहणाऱ्या आसदअली शाकीरअली सय्यद या आठ वर्षाच्या बालकाने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा यशस्वीरीत्या पुर्ण केला. यामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.