Home » माझा बीड जिल्हा » वाहने लावण्यासाठी जागा द्यावी – अँड.अजित देशमुख.

वाहने लावण्यासाठी जागा द्यावी – अँड.अजित देशमुख.

वाहने लावण्यासाठी जागा द्यावी – अँड.अजित देशमुख.

-/डोंगरचा राजा / आँनलाईन.

– आता व्यापाऱ्यांनी ग्राहकांना सुभाष रोडवर वाहने लावण्यासाठी जागा द्यावी – अँड. अजित देशमुख

बीड – व्यापार्‍यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ झालेले आंदोलन, केलेली मागणी आणि त्याला आलेले यश याबद्दल चर्चा चालू आहे. हे आंदोलन कोणाच्या माध्यमातून यशस्वी झाले, यावरही चर्चा चालू आहे. मात्र सुभाष रोडच्या या पन्नास व्यापाऱ्यांनी आपापल्या ग्राहकांना वाहन लावण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे दिवसाकाठी दहा हजार लोकांना अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावर लावलेल्या वाहनांवर कारवाई करण्यापेक्षा व्यापाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक असल्याचे मत जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

पोलिसांचा कोणालाही त्रास होत असेल तर ही बाब निषेधार्ह आहे. मात्र त्याच बरोबर कमी संख्याबळ असलेले पोलीस या काळात कशा कशा कसरती करत आहेत, याकडेही जनतेने लक्ष देणे आवश्यक आहे. व्यापाऱ्यां बरोबर घडलेल्या घटना अनावधानाने झाल्या असतील की, जाणीवपूर्वक या खोलात आम्हाला जायचे नाही.

सुभाष रोडच्या व्यापाऱ्यांनी बांधकामे केलेली आहेत. त्या सर्व व्यापाऱ्यांनी नेत्यांच्या बगलाला जाऊन बसत रस्त्यापर्यंत बांधकाम केलेली आहेत. त्यातच नगरपालिकेने या रस्त्यावर उभारलेले गाळे हे देखील प्रचंड अडचण निर्माण करत आहेत. त्यामुळे रस्ता कायम जाम राहत असून लोकांना रहदारीला अडथळा निर्माण होत आहे.

कोरोना महामारी च्या काळामध्ये सोशल डिस्टन्स ठेवणे सुद्धा या रस्त्याने जाताना शक्य असल्याचे दिसत नाही. याला व्यापाऱ्या बरोबर नगर पालिकेचे कुचकामी प्रशासन कारणीभूत आहे. या रस्त्यावर वाहने लावणार्‍यांवर कारवाई करण्या अगोदर त्या वाहनातील ग्राहक ज्या दुकानात गेले आहेत, त्या दुकानदारावर कारवाई करावी. अन्यथा दुकानदारांनी ग्राहकांना वाहने लावण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. असे न झाल्यास आम्हाला बाबत वेगळा विचार करावा लागेल. कोरोना महामारी संपल्यानंतर आम्ही तो विचार करू, असे अँड. देशमुख यांनी म्हटले आहे.

बांधकाम करताना जी खुली जागा सोडावी लागते, त्याच बरोबर ज्या उद्देशाने बांधकाम केलेले आहे, त्या उद्देशामुळे जमा होणारी गर्दी आणि उभी करावी लागणारी वाहने यासाठी पार्किंग सोडलेली नाही. नगर पालिकेचे गचाळ प्रशासन या सर्व बाबीला कारणीभूत असून बीड शहर वासियांना या ठिकाणी कायम अडचणीला आणि रहदारीला तोंड द्यावे लागते. हे बंद होण्यासाठी देखील योग्य पाऊल उचलावे लागेल. पोलिसांनी इथं थांबणाऱ्या वाहनावर कारवाई करताना संबंधीत दुकानदारावरही कारवाई करावी, असेही अँड. देशमुख यांनी म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.