Home » देश-विदेश » काळजी घ्या,सुरक्षित राहा ! – खा.डॉ.मुंडे

काळजी घ्या,सुरक्षित राहा ! – खा.डॉ.मुंडे

काळजी घ्या,सुरक्षित राहा ! – खा.डॉ.मुंडे

-/डोंगरचा राजा / आँनलाईन.

बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचे दोन रुग्ण आढळल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी श्री.रेखावर तसेच पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला.जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांची माहिती घेऊन जिल्ह्याच्या सर्व सीमांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.तसेच जिल्हा रुग्णालयातील पूर्व तयारीची माहिती घेऊन आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

बीड जिल्ह्यातील नागरीकांनी घाबरून जाऊ नये,प्रशासन आपली सर्वतोपरी काळजी घेणार आहे.संपूर्ण देश कोरोनाशी लढत असताना बीड जिल्ह्यातील सुजाण नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करून आजपर्यंत कोरोनाला रोखून ठेवले होते.यापूर्वी ज्याप्रमाणे आपण प्रशासनाला सहकार्य केले आहे त्याचप्रमाणे यापुढे देखील सहकार्य करायचे आहे.प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करून आपल्याला कोरोनावर मात करायची आहे.आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत.काळजी घ्या,सुरक्षित राहा !!

Leave a Reply

Your email address will not be published.