Home » माझा बीड जिल्हा » सर्व बॅंका रविवारी ठेवाव्यात – जिल्हाधिकारी.

सर्व बॅंका रविवारी ठेवाव्यात – जिल्हाधिकारी.

सर्व बॅंका रविवारी ठेवाव्यात – जिल्हाधिकारी.

-/ डोंगरचा राजा / आँनलाईन.

– जिल्हयातील सर्व बैंका रविवारी (१७ मे रोजी) संचारबंदी शिथिल कालावधीत चालू ठेवाव्यात-जिल्हाधिकारी राहुल रेखावार*

बीड – जिल्हयातील सर्व बैंका दिनांक १७ में २०२० रोजी संचारबंदीच्या शिथिल कालावधीत चालू ठेवाव्यात , रविवारी सुट्टीच्या कारणामुळे बाधा येवू न देता या आधीच्या आदेशाप्रमाणेच बँकांचे कामकाज चालू ठेवावे असे आदेश राहूल रेखावार, अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी , बीड यांनी दिले आहेत.

दिनांक १७ मे २०२० रोजी रविवार निमित्त सुट्टी असून सदरील बँका विषम दिनांकास बद राहिल्यामूळे सदरील परिस्थितीच्या कालावधीात लोकाना आर्थिक व्यवहार करणेस अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे . तसेच या विषम दिनांकास संचारबंदीतुन ग्रामीण व शहरीभागात सकाळी ७ ते दुपारी २.०० वा या वेळेत शिथिलता देण्यात आलेली आहे . यामुळे सदर कालावधीत बँकांचे कामकाज चालू ठेवावे असे सूचित केले आहे.

राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करुन खंड २,३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे , आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम २ ( अ ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत .
जिल्ह्यात फौजदारी प्रकिया संहिताचे कलम १४४ ( १)(३ ) नूसार दिनाक १७ में २०३० रोजी रात्री १२.०० वा . पर्यत मनाई आदेश लागू करण्याात आले आहेत. तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश , सुधारीत आदेश , सुधारणा आदेश या आदेशासह अमलात राहतील .
०००००

Leave a Reply

Your email address will not be published.