या गावात बफर झोन जाहीर..
-/डोंगरचा राजा / आँनलाईन.
– केज तालुक्यातील सोनेसांगवी, मांगवडगांव, माळेगांव, लाखा,भोपळा, हादगाव ,सुर्डी,व बोरगांव या गावात बफर झोन जाहीर- जिल्हाधिकारी राहुल रेखावार.
बीड – जिल्ह्यालगतच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे कोविड-१९ कोरोना विषाणूचे ०३ रुग्ण आढळून आले असून यामुळे केज तालुक्यातील ०७ कि.मी. परिसरात मौ. सोनेसांगवी, मांगवडगांव, माळेगांव, लाखा,भोपळा, हादगाव ,सुर्डी,व बोरगांव ही गावे येत असल्यामुळे या गावात बफर झोन (Buffer Zone )जाहीर करणे आल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज दिले.
जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी याबाबत कळविले असल्याने बीड जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फौजदारी प्रक्रिया दंड सहिता १९७३ चे कलम १४४ नुसार सदर आदेश दिले आहेत.
कळंब शहराच्या ०३ कि. मी. परिसरामध्ये बीड जिल्ह्यातील एकही गाव येत नाहीत परंतु या गावापासून ०७ कि. मी. परिसरात ( मौ. सोनेसांगवी, मांगवडगांव, माळेगांव, लाखा,भोपळा, हादगाव ,सुर्डी,व बोरगांव) हि गावे आहेत. ह्या गावांचा परिसर बफर झोन (Buffer Zone) म्हणून घोषित करण्यात आला आहे. वरील सर्व गावे अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येऊन संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यात दिनांक 17 में 2020 रोजीचे रात्री १२.०० वा.पर्यंत फौजदारी प्रक्रीया संहिताचे कलम १४४ (१) (३) मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारित आदेश, सुधारणा आदेश या आदेशास सह अंमलात राहतील.
०००००