Home » माझा बीड जिल्हा » प्रतिकचे मुख्यमंत्री निधीत २१ हजार

प्रतिकचे मुख्यमंत्री निधीत २१ हजार

प्रतिकचे मुख्यमंत्री निधीत २१ हजार

-/ डोंगरचा राजा / आँनलाईन.

– प्रतीक भोपळे याने वाढदिवस साजरा न करता मुख्यमंत्री निधीत एकवीस हजार रुपये जमा केले.

बीड – कोरोनाचे संकट देशावर आले. त्यामुळे प्रतीक राजेंद्र भोपळे या विद्यार्थ्याने आपला वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले. वाढदिवस साजरा न करता प्रतिक याने एकवीस हजार रुपयांचा निधी वाढदिवसाचे निमित्ताने मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा केला. त्याने तरुणां समोर आदर्श निर्माण केला आहे.

एस. पी. इंजिनिअरिंग कॉलेज, मुंबई येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा प्रतीक हा मूळ जवाहर कॉलनी, नगर रोड, बीड येथील रहिवासी आहे. त्याचे वडील उप विभागीय अभियंता म्हणून कार्यरत आहेत. वाढदिवस साजरा करून खर्च झालेला पैसा हा बऱ्याच प्रमाणात वाया जातो. त्यातच देशासमोर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.

त्यामुळे प्रतीक आणि त्याच्या कुटुंबीयांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. या निर्णया नंतर त्याने मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये एकवीस हजार रुपये जमा केले. त्यामुळे प्रतिक याचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.