Home » ब्रेकिंग न्यूज » जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण नाही

जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण नाही

जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण नाही

-/डोंगरचा राजा / आँनलाईन.

बीड – जिल्ह्यात सध्या (दि.14 मे 2020 पर्यंत) एकही कोरोनाचा रुग्ण नाही. बीड जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा *शुन्य* आहे. जिल्ह्यात कोरोनाचा नवीन रुग्ण सापडल्याच्या अफवा ऐकल्यास नागरिकांनी सध्या त्यावर कोणताही विश्वास ठेवू नये.
आजपर्यंत जिल्ह्यातून घेतलेल्या 378 स्वॅब पैकी 377 स्वॅबचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे. तर आज पाठविलेले स्वॅबपैकी एकाचा अहवाल येणे बाकी असून हा प्रलंबित अहवाल प्राप्त झाल्यानंतर कळविण्यात येईल.
याबाबत विचारणा करण्यात येत असल्याने नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. आलेल्या संदेशाची खात्री करावी. घाबरून जावू नये. जिल्ह्यात आतापर्यंत फक्त एकच रूग्ण आढळून आला होता व तो आढळलेला एकमेव रुग्ण देखील यापूर्वी कोरोनामुक्त झालेला आहे. शांतता राखा, संयम ठेवावा. प्रशासनाच्या सुचनांचे पालन करून स्वत: व कुटूंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published.