Home » विशेष लेख » स्वराज्याचे पहिले युवराज छात्रवीर शंभुराजे

स्वराज्याचे पहिले युवराज छात्रवीर शंभुराजे

स्वराज्याचे पहिले युवराज छात्रवीर शंभुराजे

-/डोंगरचा राजा / आँनलाईन.

मराठ्यांच्या इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व स्वराज्याचे पहिले युवराज संभाजीराजे शिवाजीराजे भोसले.
१४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे छत्रपती शिवाजी महाराज व थोरल्या महारणीसाहेब सईबाई यांच्या पोटी शिवपुत्र संभाजीराजे यांचा जन्म झाला. स्वराज्याला युवराज झाल्यामुळे शिवाजीराजे व स्वराज्यातील रयत आनंदाने बहरून गेली होती. परंतु संभाजीराजांच्या बालपणापासूनच आनेक कटू प्रसंगाला सामोरे जावे लागले. युवराज आगदी दोन वर्षाचे असतानाच मातेचे छत्र हरवले. बाळंत पानाच्या व्याधीने सईबाई मरण पावल्या. व “पुण्याजवळील कापूरहोळ या गावातील धाराऊ गाडे पाटील” या शंभूराजांच्या दुध आई बनल्या. सईबाईंच्या जाण्याने युवराज संभाजीराजे यांची जबाबदारी आजी जिजाऊ यांच्यावर पडली व आर्थातच जिजाऊंच्या संस्कारात शंभूराजांचे जडण घडण झाली.
संभाजीराजे अतिशय देखणे, हुशार व चाणाक्ष होते. राज्यकारभार चालवण्याचे सर्व बाळकडू शिवरायांप्रमानेच जिजाऊनी शंभुराजांना ही दिले होते. आवघ्या ९ व्या वर्षी शंभूराजांनी आग्रा कैद व त्यादरम्यान मुघल दरबारात त्यांना रहावे लागले. आपल्या आबासाहेबांचा कणखरबाना व गनिमी कावा त्यांनी स्वतः पाहीतला होता. त्याच बरोबर आग्रा सुटकेच्या वेळी “शंभुराजे निधन” या खोट्या अफवेमुळे त्यांना बऱ्याच काळ मथुरेला रहावे लागले.
०६ जून १६७४ साली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा झाला. यावेळी स्वराज्याचे पहिले युवराज म्हणून शंभूराजांच्या ही मानसन्मान झाला होता. परंतु अवघ्या १२ दिवसांनीच राजमाता जिजाऊ यांचे निधन झाले व संभाजीराजांवर आईप्रमाणे माया करणाऱ्या जिजाऊ ही निघून गेल्या. ही घटना संभाजी महाराजांना अतिशय दुःख दायक होती. त्यानंतर हळूहळू स्वराज्यातील काही लोकांशी संभाजी महाराजांचे मतभेद होऊ लागले. आणजीपंत हे अनुभवी प्रशासक असल्यामुळे शिवाजी महाराज त्यांच्याकडे अनेकदा दुर्लक्ष करत होते. परंतु संभाजीराजे मात्र ते सहन होत नव्हते. म्हणून आंनोजीपंत व इतर काही मंडळींनी संभाजी महाराजांबद्दल षडयंत्र रचून त्यांना बदनाम करण्याची योजना आखली. हे सर्व शिवाजी महाराज यांच्या लक्षात आल्यामुळे दक्षिन मोहिमेवर जाताना त्यांनी शंभुराज्यांना शृंगारपुर पाठवले. आपल्या पित्याच्या आदेशाचे पालन करून शंभूराजे शृंगारपुर राहून स्वराज्य निष्ठेने महाराज सांगतील त्या प्रमाणे काम करत होते. इकडे स्वराज्यात मात्र संभाजी महाराजांबद्दल गौर प्रसार वाढून त्यांना बदनाम करून रयते समोर व स्वराज्यातील प्रधनासमोर त्यांना बदनाम करण्यात येत होते. परंतु आपल्या वडिलांना व स्वराज्याला सर्वस्व मानून कशाचीही पर्वा न करता शंभूराजे आपले काम करत होते. जिजाऊंच्या संस्कारात व शिवरायांच्या पोटी जन्मलेले शिवसुर्य शंभूराजे अतिशय मनमिळाऊ, हुशार, निर्व्यसनी, चारित्र्यसंपन्न होते. हे खुद्द आबासाहेब व रयतेला माहीत होते. शत्रुलाही लाजवेल असे धाडसी व पराक्रमाने शत्रुंचाही थरकाप उडाला होता. चक्क बादशहा औरंगजेब संभाजी महाराजाबद्दल बोलताना म्हणतो “संभा जेसा बेटा मूजे होता तो मौ पुरी दुनिया पर राज करता. ”
शंभूराजे हे एकाच वेळी सिद्दी जौहर, औरंगजेब, फिरंगी, टोपीकर यासारख्या असंख्य बलाढ्य फौजेशी लढा देत आसत. आपल्या ९ वर्षाच्या कार्यकाळात कुठलाही तह नकरणारा, कुठलीही लढाई न हरलेला व १५० लढाया लढणारा हा युगधुरांधर राजा ज्याच्या परक्रमाला इतिहासात तोड नाही. तसेच संभाजीराजे हे सहितिक, संस्कृतपंडित, व बहुभाषिक ही होते. त्यांना १४ भाषा ज्ञात होत्या. त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला, त्याच बरोबर सातसतक, नाईकाभेद, यासारखे ग्रंथ लिहिले. कवी कलश व संभाजी महाराजांची मैत्रीला आणेकानी विरोध केला परंतु कविकलश व त्यांच्यात विश्वासाचे नाते कायम टिकून होते. ते शेवटी मारताना ही त्यांच्याच सोबत राहिले व सोबत प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले. आज छत्रपती संभाजी महाराज या महापराक्रमी महामानवाची ३६३ वी जयंती आसुन त्यांना मी माझ्या वतीने व माझ्या शिवक्रांती संघटनेच्या वतीने अभिवादन करून सर्व शिव-शंभू प्रेमींना शुभेच्छा देतो.

आपला
गणेश (दादासाहेब) बजगुडे
पाटील
संस्थापक अध्यक्ष
शिवक्रांती संघटना महाराष्ट्र
मो. ९४२१२८१०१२

Leave a Reply

Your email address will not be published.