Home » माझा बीड जिल्हा » जनआंदोलन जिल्हा प्रशासना सोबत – अँड.देशमुख

जनआंदोलन जिल्हा प्रशासना सोबत – अँड.देशमुख

जनआंदोलन जिल्हा प्रशासना सोबत – अँड.देशमुख

-/डोंगरचा राजा / आँनलाईन.

– जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहना प्रमाणे निडली ॲप द्वारे घरपोच खरेदी करून गर्दी टाळा

– कोरोना काळात जनआंदोलन जिल्हा प्रशासना बरोबर.

बीड – बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिनांक ९ मे रोजी पारित केलेल्या आदेशाप्रमाणे जनतेने निडली ॲप डाऊनलोड करून घ्यावा आणि घरपोच सेवा उपलब्ध करून घ्यावी. औरंगाबाद आणि सोलापूर सारखी परिस्थिती सुदैवाने आपल्याकडे नाही. हीच परिस्थिती कायम ठेवण्यासाठी जनतेने स्वतःहून गर्दी करणे टाळावे. आज जिल्हाधिकारी यांच्यासोबत तासभर झालेल्या चर्चेदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेला हे आवाहन केले तर कोरोना काळात जनआंदोलन जिल्हा प्रशासन बरोबर राहील, असे आश्वासन जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

जनतेने निडली ॲप हा मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घ्यावा. आणि याद्वारे घरपोच खरेदी करावी.ही पद्धत अत्यंत सोपी असून जनतेला हितकारी ठरणारी आहे. त्याप्रमाणे मोबाईल फोन वरून ही सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न दुकानदारांनी देखील करून फोन आल्यानंतर अथवा व्हाट्सअप वर मागणी नोंदविल्यानंतर देखील जनतेला त्या त्या वस्तू उपलब्ध करून द्याव्यात. असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केलेले आहे.

कमी उत्पन्न असणाऱ्या वस्त्यांमध्ये दुकानदारांनी अँपमधील ऑर्डरची किमान रक्कम शुल्क कमी ठेवावी. जेणे करून गरीब कुटुंबांना त्याचा फायदा घेता येईल. या कुटुंबांना काही कारणास्तव ऍप वापरणे शक्य नसेल, तर त्या कुटुंबांना फोनवरून किंवा व्हाट्सअप वरून दुकानदारांकडे आपली मागणी नोंदवता येईल. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे अशी पद्धत वापरण्यासाठी सुविधा उपलब्ध नाही. त्यांना शेजाऱ्यांनी मदत करावी, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

दिनांक १३ मे पासून जिल्ह्यातील अकरा शहरांमध्ये किराणा सामानाची संपूर्णपणे घरपोच सेवा उपलब्ध होणार आहे. दुकाने ग्राहकांसाठी बंद ठेवण्यात येणार असली तरी ग्राहकांना ॲप द्वारे पूर्ण माल घरपोच मिळणार असल्याने ग्राहकांनी गोंधळून जाण्याच्या परिस्थितीत राहण्याची आवश्यकता नाही.

होलसेल आणि रिटेल दुकानदारांना पूर्वी प्रमाणे पास असल्यावर संचारबंदी काळात माल उतरून घेण्याच्या परवानगी मध्ये कोणताही बदल केलेला नसल्याने आदेशाच्या अंमलबजावणीत कसलाही अडथळा येऊ शकत नाही.

निडली अँप हा डाऊनलोड करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्या शहरांमध्ये किती दुकाने, कोणत्या ठिकाणी आणि आपल्या घरापासून किती अंतरावर आहेत, हे ग्राहकांना स्पष्ट दिसेल त्याचप्रमाणे दुकानदाराकडे कोणत्या वस्तू किती रुपये दराने विक्रीसाठी उपलब्ध आहेत, किंमत काय आहे, हे देखील कळेल. त्यामुळे जनतेने गडबडून जाण्याची आवश्यकता नाही.

जनतेला ग्राहक म्हणून सेवा देताना ती सेवा योग्य देणे, हे दुकानदाराचे कर्तव्य असून मागवलेल्या वस्तू पैकी एखादी वस्तू पसंत नसेल तर ती वस्तू परत करण्याचा अधिकार देखील कायद्याप्रमाणे नागरिकांना आहे. मात्र साधारणता जनता आपापल्या ठरलेल्या दुकानातूनच खरेदी करणार असल्याने या ही सुविधा निश्चितच कामाला येणार आहे.

दुर्देवाने आपल्या लगतच्या औरंगाबाद आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोणाची निर्माण झालेली परिस्थिती पाहता, बीड जिल्हा प्रशासन योग्य प्रकारे परिस्थिती हाताळत असल्याने जिल्हा प्रशासनाला पूर्ण मदत करणे, हे जनतेचे कर्तव्य आहे. त्यामुळे जनतेने जिल्हा प्रशासनाच्या प्रत्येक आदेशाचे पालन करून, सामाजिक अंतर ठेवून आणि मास्क वापरून स्वतःची जीवन अबाधित ठेवणे गरजेचे आहे.

या अँप द्वारे किती खरेदी झाली, त्यातील सर्वोच्च सहभाग नोंदवणारे दुकानदार कोण ? याची माहिती खरेदी अँप कार्यरत झाल्यावर जनतेला प्रशासनाने द्यावी. जिल्हा प्रशासनाने जनतेचे हित पाहूनच रात्रंदिवस जिल्ह्यात यंत्रणा राबविली आहे. कोरोना काळामध्ये जन आंदोलन जिल्हा प्रशासना बरोबर राहून जनतेपर्यंत जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेत देशमुख यांनी जिल्हाधिकार्‍यांना आश्वासन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.