Home » माझी वडवणी » कामगारांना तात्काळ मदत करा – सौ.माळी

कामगारांना तात्काळ मदत करा – सौ.माळी

कामगारांना तात्काळ मदत करा – सौ.माळी

-/ डोंगरचा राजा / आँनलाईन

बांधकाम कामगारांना आशेची टोपली बीड जिल्ह्यात बांधकाम कामगार हजारोंच्या संख्येनं आहेत.करोना विषाणू महामारी मुळे बांधकाम कामगारांना काम नाही,आज दोन महिने झाले, बांधकाम, बिगारी, विट्टभटी, फर्निचर,असे अनेक कामगार घरी बसून आहेत, नाही दोन हजार नाही त्यांचा मुलांची स्काॅलरसिफ अनेक कामगार यांच्या डिलेव्हरी, लग्न,काही कामगार मयत झाले त्यांच्या वारसांना मदत नाही, असे अनेक कामगारांची भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे, सरकारने दोन हजार मंजूर केले आहे अजुनही कामगारांच्या खात्यात एक रूपया देखील जमा नाही, बीड जिल्ह्यात बांधकाम कामगार आॅफिसला कुलुप आहे मग कामगार लोक कुठे चौकशी करणार, आॅफिस मधील कर्मचारी यांना चौकशी केली तर सरळ हात वर करतात आणि फोन घेत नाहीत, त्यामुळे सरकारने बांधकाम कामगारांना लवकरात लवकर मदत करावी. मोठ्या प्रमाणात कामगारांचे हाल चालू आहेत. आज कामगाराची मुल बाळ उपाशी बसत आहेत, त्यांना धान्य मिळत नाही,कसे जगणार कामगार , करोनाच्या पार्श्वभुमिवर लोकांच्या हाताला कामे नाहीत. तरी सरकारने बांधकाम कामगार याचा विचार करून तात्काळ मदत द्यावी.अशी मागणी सौ.प्रमिलाताई माळी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.