समनापूरच्या २५ लाभार्थ्यांना किराणा किट वाटप.
-/ डोंगरचा राजा / आँनलाईन.
– नाम फाऊंडेशनचे मनापासून आभार – तुषार शेळके
बीड – जिल्ह्यात कोरोनामुळे जनता त्रस्त झालेली आहे. बीड तालुक्यातील समनापुर येथील पंचवीस लाभार्थ्यांना किराणा सामानाची आवश्यकता होती. त्यामुळे गावातील तुषार शेळके यांनी अँड. अजित देशमुख यांच्याकडे संपर्क साधला. आणि गावातील पंचवीस गरजूंना किराणा सामानाचे कीट वाटप करण्यात आले.
यावेळी देशमुख यांच्या बरोबर चर्चा करताना नामने केलेल्या सहकार्या बद्दल आभार व्यक्त केले. जिल्ह्याबाहेरील लोकांची नाम फाउंडेशन चारा आणि अन्य सहकार्यासाठी जिल्हा वासीयांच्या मदतीला नेहमीच धावून येत असल्याने नामचे आभार व्यक्त केले आहेत.
सिने अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या तर्फे ही किराणा सामानाची किट प्राप्त झाली असून त्याचे वाटप जिल्ह्या भरात करण्यात आले आहे, असे देशमुख यांनी यावेळी सांगितले. पंचवीस गरजूंना किराणा सामानाचे किट दिल्यानंतर त्यांनीही नाम फाउंडेशन चे आभार मानले आहेत.
यावेळी लाभार्थी सह गावातील काही प्रतिष्ठित मंडळी देखील उपस्थित होते. कोरोना मुळे जनतेला कामधंद्यासाठी कुठेही जाता येत नाही. जनता नियमाचे पालन करून घरीच थांबली असल्याने काहींना वेगवेगळ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. वाटप झालेल्या किराणामुळे या लोकांचा काही दिवसांचा प्रश्न सुटणार असल्याने तुषार शेळके यांनी नामचे आभार मानले. लाभार्थ्यांनी देखील नामला धन्यवाद दिले आहेत.