Home » माझी वडवणी » निर्मला निकेतन मुंबईच्या मदतीचा तिसरा टप्पा पूर्ण

निर्मला निकेतन मुंबईच्या मदतीचा तिसरा टप्पा पूर्ण

निर्मला निकेतन मुंबईच्या मदतीचा तिसरा टप्पा पूर्ण

-/डोंगरचा राजा / आँनलाईन.

– समाजकार्य महाविद्यालय निर्मला निकेतन मुंबईच्या मदतीने विद्यार्थी दत्तात्रय वाघमारे यांनी वडवणी शहरात मदतीचा तिसरा टप्पा पूर्ण केला. वडवणी शहराच्या बाजूला छोट्या कोप्यामध्ये राहणाऱ्या भटक्या जमातीमधील ५५ हुन अधिक कुटुंबांना एक आठवडा भर पुरेल एवढे रेशन वाटप करण्यात आले. लॉक डाऊनच्या काळात आज देश विदेशात अनेकांवर उपासमारीची वेळ येत आहे. मात्र ही उपासमारीची वेळ सर्वांनवर येऊ नये म्हणून आम्हीं काम करत आहोत. या कार्यासाठी मदत व तसेच मोलाचे मार्गदर्शन करणारे प्राचार्या डॉ. लिडविन डायस, प्रोफेसर डॉ. प्रभा तिरमारे, मेघा निकम, संतोष बिरवाटकर, अंजली चाळीसगावकर, मिलिंद चाळीसगवकर व वडील सोनाजी वाघमारे यांचे सहकार्य लाभले. राशन वाटप करण्यासाठी गावातील तरुण मित्र मंडळ गणेश सोनटक्के, बाजीराव वाघमारे, ज्ञानेश्वर मुळे, बाबा पवार अशोक शिंदे, भकाचंद उदावंत तसेच विशेष मदत भागवत वाघमारे यांची लाभली. आतापर्यंत साळिंबा या गावात भूमिहीन, निराधार व ऊसतोड कामगारांना मदत केली होती, त्यानंतर हैदराबाद येथील ६ कुटुंबे हे कामाच्या शोधत वडवणी शहरात येऊन अडकले त्यांना देखील १ महिना पुरेल एवढे रेशन देण्यात आले. हे कार्य इथे न थांबता पुढेही असेच चालू राहणार आहे. कोरोना या महामारी पासून वाचण्यासाठी प्रत्येकास घरात राहण्याची विनंती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.