Home » माझी वडवणी » विधवा व परित्यक्त्या महिलांना अन्नधान्य वाटप.

विधवा व परित्यक्त्या महिलांना अन्नधान्य वाटप.

विधवा व परित्यक्त्या महिलांना अन्नधान्य वाटप.

-/डोंगरचा राजा / आँनलाईन.

– मोहिनीराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कळसंबर च्या वतीने विधवा व परित्यक्त्या महिलांना अन्नधान्य वाटप
—————————————-
नेकनुर – शेखर मुंदडा संस्थापक, महा एनजीओ फेडरेशन पुणे,राज्य समन्वयक विजय वरुडकर, वैभव मोगरेकर संस्थापक, संचालक रोस्ट्रम इंडिया सोशल ऑर्गनायझेशन (रिसो) यांच्या मार्गदर्शनाखाली मोहनीराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कळसंबर तालुका बीड जिल्हा बीड च्या अध्यक्ष सौ अर्चना महादेव वाघमारे यांच्या पुढाकाराने समाज सेवक अरविंद जाधव, श्री शुक्राचार्य वाघमारे, लक्सिमन सालुगडे, फुलचंद धनवे, बंकट वाघमारे तसेच सरपंच यांच्या उपस्थितीत सावरगाव येथे विधवा परितक्त्या गरजू महिला कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले यामध्ये गव्हाचे पीठ, तांदूळ, तेल, तूर डाळ, हरभरा डाळ, मिरची, हळद, मीठ, अंबारी, लाईफ बॉय साबण सदरील किराणा साहित्याचे किट गरजूंना देण्यात आली. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात जगात कॉरोनाचे संकट घोंगावत असताना अनेक व्यक्तींच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला या परिस्थितीमुळे विधवा परितक्त्या गोरगरीब मोलमजुरी करणारे अशा लोकांवर मोठे अरिष्ट कोसळले बीड जिल्ह्यात ही परिस्थिती वेगळी नाही जिल्ह्यातील अशा लोकांवर उपासमारीची वेळ आली त्यांना जगण्याचा मोठा प्रश्न सरकार आणि प्रशासनाला होता यासाठी प्रशासनाने स्वयंसेवी संस्थांना मदत करण्याचे आवाहन केले होते प्रशासनाच्या या आव्हानाला महा एनजीओ फेडरेशन पुणे, रोस्ट्रम इंडिया सोशल ऑर्गनायझेशन (रिसो) व मोहिनीराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कळसंबर यांनी साथ दिली व सावरगाव येथे अन्नधान्याच्या जीवनावश्यक किटच वाटप दि 30.04.2020 रोजी लॉक डाऊन चे नियम पाळत करण्यात आले. किराणा मालाचे वाटप केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच आमचे गमक . आपण आपल्या समाजाला आपल्या राष्ट्राला मदत केली पाहिजे मदतीने जे समाधान मिळतं ते इतर कोठेही मिळत नाही मदत केल्यानंतर समोरच्याला असं वाटलं पाहिजे की आपलं कुणीतरी आपल्यासाठी धावून आला आहे आणि असंच काम मोहनीराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कळसंबर ही संस्था करण्याचा प्रयत्न करते आपल्याला ही मदत करण्याची इच्छा असेल तर तर संस्थेचे अध्यक्ष सौ अर्चना महादेव वाघमारे मोबाईल नंबर 7977436587 आमच्याशी संपर्क करून आम्ही तुमच्या सहयोगाने आणखी बऱ्याच गरजू लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि आपल्या देशाला या संकटातून वाचण्यासाठी खारीचा वाटा उचलू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published.