Home » माझा बीड जिल्हा » तेलगाव – वडवणी;अधिकार्‍यांचे दुर्लक्ष – अँड.देशमुख

तेलगाव – वडवणी;अधिकार्‍यांचे दुर्लक्ष – अँड.देशमुख

तेलगाव,वडवणी;अधिकार्‍यांचे दुर्लक्ष – अँड.देशमुख

-/डोंगरचा राजा / आँनलाईन.

बीड – तेलगाव ते वडवणी या रस्त्याच्या कामाची सुरुवात दोन दिवसापूर्वी झालेली आहे. नऊ कोटी रुपयांचे हे काम असून यश कन्स्ट्रक्शन, लातूर यांच्यामार्फत हे काम चालू आहे. डी.बी.एम. आणि कार्पेट असे दोन्ही मिळून ८० एम. एम. जाडीचे थर इथे टाकायचे आहेत. रस्त्याची झालेली दुर्दशा पाहता हा रस्ता चांगला व्हायला हवा आणि खूप काळ टिकावा, यासाठी या कामावर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांनी आणि कंत्रारदराने काम चांगले करावे अन्यथा कुठेही कसूर वाटली तर गुणनियंत्रण विभागाकडे तक्रार करण्यात येईल, असा इशारा जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी दिला आहे.

तेलगाव ते वडवणी या पंधरा किलो मीटर लांबीच्या रस्त्याचे काम चालू झाले आहे. या रस्त्याची रुंदी सात मीटर एवढी आहे. यावर डी. बी. एम. पन्नास एम. एम. आणि तीस एम. एम. जाडीचे असे एकूण ८० एम. एम. जाडीचे काम होणार आहे. हा रस्ता अत्यंत खराब झालेला असून अनेक अपघातांना या रस्त्याने निमंत्रण दिलेले आहे.

या रस्त्याचे काम चालू आहे. डी. बी. एम. आणि कार्पेट या दोन्ही थरातील काम टप्प्याटप्प्याने होणे आवश्यक आहे. डांबराचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे. बावी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे.

अधिकाऱ्यांनी या रस्त्याचे कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे डांबराचे आणि रस्त्याच्या कामाच्या जाडीचे नेहमी मोजमाप घ्यावे. सध्या तरी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसते. दर्जा बाबत अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी. अन्यथा गुण नियंत्रण विभागाकडे या रस्त्याच्या कामाच्या चौकशीची मागणी केली जाईल. त्यानंतर होणाऱ्या परिणामाला अधिकारी आणि कंत्राटदार हेच जबाबदार राहतील.

टेंडर निघाल्या पासूनच आमचे या रस्त्याच्या कामाकडे लक्ष आहे. काम पूर्ण होई पर्यंत याकडे आमचे लक्ष राहील. तक्रार होऊन कारवाई आणि चौकशी होण्यापेक्षा काम चांगले व्हावे, ही आमची इच्छा आहे. त्यामुळे कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी आतापासूनच लक्ष ठेवावे. त्याच प्रमाणे ज्या ज्या गावाच्या हद्दी मधून या रस्त्याचे काम होत आहे, त्या गावातील सर्व जनतेने या कामाकडे आताच लक्ष द्यावे. वेळ निघून गेल्यानंतर पुन्हा खड्ड्यातून जाणे भाग पडू नये, यासाठी कामाच्या दर्जा बाबत कसलीही तडजोड अधिकाऱ्यांनी करू नये. अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशाराही अँड. देशमुख यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.