Home » ब्रेकिंग न्यूज » आधार,एटीएम द्वारे काढा पोस्टातून बँकेतील पैसे..

आधार,एटीएम द्वारे काढा पोस्टातून बँकेतील पैसे..

आधार,एटीएम द्वारे काढा पोस्टातून बँकेतील पैसे..

-/डोंगरचा राजा / आँनलाईन

बीड – कोणत्याही बँक खात्यातील पैसे काढण्याची पूर्णपणे सुरक्षित व पेपरलेस सुविधा कोरणा विषाणू covid-19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आर्थिक दुर्बल घटकांसाठी ज्यांना सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत त्यांची उपजीविका भागविणे कठीण जाते, त्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून रुपये 1 लाख 70 हजार कोटीचा मदत निधी जाहीर केला असून सदरील रक्कम जनधन योजना, पी एम किसान योजना ,उज्वल योजना इत्यादी योजनांच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने जमा केले जात आहे. यामध्ये प्रामुख्याने महिला जनधन खाते धारकांच्या खात्यावर रुपये पाचशे प्रतिमहिना तीन महिन्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रुपये 2000 पी एम किसान योजनेअंतर्गत पहिला हप्ता तात्काळ जमा केले जात आहेत. या परिस्थितीत गावातील नागरिकांनी आर्थिक कोंडी होऊ नये यासाठी आपल्या गावातील डाक कार्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या पोस्टमास्तर, पोस्टमन यांचे मार्फत नागरिक आपल्या राष्ट्रीयीकृत व खाजगी बँक खात्यामधून महाराष्ट्र ग्रामीण बँक, आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वगळून लाभांची किंवा इतर कोणतीही रक्कम AEPS द्वारे आधार नंबर आणि मोबाईल नंबर वापरून काढू शकतात. जिल्ह्यातील मागील दहा दिवसात नागरिकांनी जवळ पस्तीस लाख रुपये पोस्ट ऑफिस मधून AEPS द्वारे काढले आहेत. पोस्ट विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमार्फत देण्यात येणाऱ्या AEPS या सुविधेद्वारे ही सेवा सर्व नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी या सुविधांचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन डाक अधीक्षक विभाग आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे शाखा व्यवस्थापक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.