वडवणी,आष्टीतही नाम फाऊंडेशन
-/डोंगरचा राजा / आँनलाईन.
– किराणा सामानाचे केले वाटप.
बीड – ख्यातनाम अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशन कडून वडवणी आणि आष्टी येथे काल गरजू लोकांना किराणा सामानाचे किट वाटप करण्यात आले. याप्रसंगी अँड. अजित एम. देशमुख, अण्णा महाराज दुटाळ, बाळासाहेब गलधर आदींची उपस्थिती होती.
नाम फाउंडेशन मार्फत कोरोना रोखण्यासाठी लॉक डाउन असल्यामुळे त्रस्त झालेल्या गरीब परिवाराला आधार देण्याचे काम चालू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गरजू लोकांची यादी करून नाम तर्फे त्यांना किराणा सामानाचे कीट वाटप करण्याचे काम चालू आहे. किराणा सामानाचे किट वाटप करत असताना लोक नामचे आभार मानत आहेत.
नाम तर्फे काल वडवणी, आष्टी, चिखली आणि वाकी या ठिकाणी हे किट वाटप करण्यात आले. त्या त्या ठिकाणच्या संबंधिता कडून याद्या घेवून हे वाटप पारदर्शक करण्यात करण्यात आले. याप्रसंगी नामचे आभार व्यक्त केले असून अडचणीच्या काळात चांगल्या दर्जाचा किराणा मिळाल्याने या कुटुंबाला आधार मिळाला आहे. त्यामुळे गरजू लोक आनंदी झालेले दिसत होते.