Home » माझी वडवणी » वडवणी तालुक्यात भाजपचा उपक्रम..

वडवणी तालुक्यात भाजपचा उपक्रम..

वडवणी तालुक्यात भाजपचा उपक्रम..

-/ डोंगरचा राजा / आँनलाईन.

– भाजपच्या वतीने वडवणी तालुक्यात गोरगरीब जनतेला किराणा साहित्य,सँनिटायझर,
मास्कचे वाटप.

भाजपच्या नेत्या ,माजी पालकमंत्री पंकजा मुंडे, खा.डॉ. प्रितम मुंडे, माजलगाव मतदारसंघाचे नेते रमेश आडसकर यांच्या आदेशाने भाजपचे वडवणी तालुका अध्यक्ष पोपट शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली वडवणी तालुक्यातील प्रत्येक गावागावात कोरोना विषाणू या संकटाच्या काळात सामाजिक जाणीव म्हणून नुकतेच कारखान्या वरून परत आलेल्या उसतोड मजूर, गोरगरीब, निराधार यांना किराणा साहित्य,सँनिटायझर, मास्कचे वाटप करण्यात आले.
सध्या कोरोना विषाणू रोखण्यासाठी देशात व राज्यात योग्य त्या उपाययोजना करण्यात येत असून त्याचाच भाग म्हणून लाँकडाऊन सुरू असल्याने सर्व उद्योग, व्यवहार हे बंद आहेत. बाहेर राज्यात, परराज्यात कारखान्याला उसतोडणीसाठी गेलेले उसतोड मजूर हे आपल्या गावात परत आलेले आहेत. त्यामुळे गोरगरीब ,उसतोड मजूर यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने या संकटाच्या काळात आधार देण्यासाठी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, खा.प्रितम मुंडे, भाजपा नेते रमेश आडसकर यांच्या आदेशाने या गोरगरीब, उसतोड मजूर, निराधार यांना भाजपा वडवणी तालुका अध्यक्ष पोपटराव शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील प्रत्येक गावातील सरपंच, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी किराणा साहित्य, सँनिटायझर, व मास्कचे जनतेला वाटप केले.वडवणी तालुका भाजपच्या या सामाजिक उपक्रमांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.