Home » माझा बीड जिल्हा » रोटरी क्लब सेंट्रलचा स्तुत्य उपक्रम.

रोटरी क्लब सेंट्रलचा स्तुत्य उपक्रम.

रोटरी क्लब सेंट्रलचा स्तुत्य उपक्रम.

-/ रविकांत उघडे / माजलगाव

– लऊळ च्या वसंतनगर तांड्यात डिजिटल थर्मलगन द्वारे आरोग्य तपासणी.

माजलगाव – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त लोकांची आरोग्य तपासणी व्हावी अशी शासनाची भूमिका असून कोरोना निर्मूलनाच्या पूर्ण मोहिमेत जगभरात रोटरी इंटरनॅशनलचा सक्रिय सहभाग आहे.त्यात स्थानिक पातळीवर आपलाही खारीचा वाटा असावा हा सामाजिक उद्देश ठेऊन रोटरी क्लब ऑफ माजलगाव सेंट्रल व तालुका पत्रकार संघ यांचे सयूंक्त विद्यमाने आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लऊळ नं 1 मधील वसंतनगर तांड्यावर वैद्यकीय तज्ञांच्या हस्ते डिजिटल थर्मलगन द्वारे आरोग्य तपासणी करण्यात आली.यावेळी फिजिकल डिस्टन्स ठेवत शासन निर्देशाचे पालन करण्यात आले.या तपासणीत वसंतनगर लऊळ येथील 260 व्यक्तींची तपासणी करण्यात आली त्यात 35 वयोवृद्ध जेष्ठ नागरिक 15 वर्षाच्या आतील 45 मुले व उर्वरित 15 ते 60 वयोगटातील 180 नागरिकांची तपासणी करण्यात आली तपासणीत 6 व्यक्तीना ताप सदृश साधारण आजार आढळून आले त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला.
*माजलगाव तालुक्यात प्रथमच*
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वत्रिकरित्या ग्रामीण भागात करण्यात आलेली माजलगाव तालुक्यातील ही पहिलीच आरोग्य तपासणी आहे या बाबतीत मा.तहसीलदार श्रीमती प्रतिभा गोरे यांचे निर्देशानुसार आरोग्य अधिकाऱ्यांशी समन्वय करून तालुका पत्रकार संघ व रोटरी क्लब ऑफ माजलगाव सेंट्रल यांचे सयूंक्त विद्यमाने या मोहिमेचा आज लऊळ नं 1 येथे शुभारंभ करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी जाऊन तपासणी करतांना ग्रामस्थांचे समुपदेशन करण्यात आले त्यामुळे कुठलीही भीती न बाळगता लऊळ येथील ग्रामस्थांनी या मोहीमेस उस्फुर्त प्रतिसाद दिला.या तपासणी मोहिमेत डॉ. संतोष गवते,दिपक बंडे, अनिकेत कांबळे, यश सोळंके.या आरोग्य कर्मीनी सहभाग घेतला.यावेळी रोटरी अध्यक्ष अण्णासाहेब तौर सचिव प्रभाकर शेटे प्रोजेक्ट चेअरमन सुभाष नाकलगावकर व अंकुश राठोड रोटरी सदस्य डॉ. सुनील गरड पांडुरंग चांडक विनोद जाधव रोटरी कम्युनिटी क्रॉप्स लऊळ चे अध्यक्ष प्रकाश नाना शिंदे सचीव दत्तात्रय राठोड पांडुरंग भले अनिरुद्ध हटवटे लक्ष्मीकांत वशिंबे सुभाष राथोड रंगनाथ राठोड बाबुराव राठोड उदयभान राठोड डॉ गणेश राठोड उद्धव धपाटे बाजीराव राठोड सिद्धेश्वर राठोड इत्यादी उपस्थित होते.
ही आरोग्य तपासणी यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब माजलगाव सेंट्रल चे सदस्य डॉ. काकडे डॉ. राजेभोसले डॉ.गरड डॉ.डाके डॉ.कोल्हे डॉ.सोनवणे तालुका पत्रकार संघाचे दिलीप झगडे पांडुरंग उगले पुरुषोत्तम करवा यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.