Home » ब्रेकिंग न्यूज » कठीण परिस्थितीत नामचा आधार – अँड.देशमुख

कठीण परिस्थितीत नामचा आधार – अँड.देशमुख

कठीण परिस्थितीत नामचा आधार – अँड.अजित देशमुख

-/ डोंगरचा राजा / आँनलाईन

पाटोदा – तालुक्यातील पारगाव घुमरा, नफरवाडी आणि अमंळनेर येथे आज गरजूंना किराणा सामानाचे किट वाटप करण्यात आले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नामने जनतेला केलेली मदत बीड जिल्ह्यातील जनता विसरणार नाही, अशा शब्दात जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

आज पारगाव घुमरा येथे अत्यंत शिस्तबद्ध नियोजनामध्ये या सामानाचे किट वाटप करून तेथील कार्यकर्त्यांनी जनते समोर एक चांगला आदर्श ठेवला आहे. शासनाने घेतलेल्या वेळोवेळीच्या निर्णयाचे जनतेने पालन केले आहे. प्रशासनाला मदत केली आहे. घरात बसून राहिल्यामुळे अनेक कुटुंबांना मदतीची गरज होती.

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशन मार्फत बीड जिल्ह्यात किराणा समान वाटप करण्याचे ठरले. गरजूंना आधार देत नामने उचललेले हे पाऊल जिल्ह्यातील जनतेसाठी कौतुकास्पद ठरले असून यातून सामान्य गरजूंना न्याय मिळत आहे. त्यामुळे मदतीला धावून आलेली नाम ही अतिशय महत्त्वाची ठरली आहे. जनतेच्या वतीने आपण नामचे अभिनंदन करत आहोत, असे ही अँड. देशमुख यांनी म्हटले आहे.

अंमळनेर आणि नफरवाडी येथेही किराणा सामानाची किट वाटप करण्यात आले. पात्र लाभार्थींची निवड केलेली असल्यामुळे थेट गरजूंच्या हातात कीट देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. नामची मदतीची ही भावना जनतेला दिलासा देणारी ठरली. ग्रामीण भागामध्ये नाम विषयीची आपुलकी वाढली असून गरजूंना मदत मिळाली आहे.

पारगाव येथे योगेश सुरेशराव घुमरे, राजू घुमरे, अशोक घुमरे, गणेश भोसले, योगेश गाडेकर आणि त्यांचे मित्र मंडळ, नफरवाडी मध्ये प्रकाश सवासे, त्याच प्रमाणे अंमळनेर येथे अनिल पवार, तुकाराम पोकळे, अर्जुन पोकळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याबद्दल नियोजन करत या वाटपात मदत केली. या सर्व ठिकाणी मनोज देशमुख, शुभम कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला.

* पारगावात युवकांनी वाटला गहू *
——————————————–

पारगाव घुमरा येथील युवा कार्यकर्त्यांनी अत्यंत चांगले पाऊल उचलत नामच्या बरोबरच प्रत्येक गरजूंना चार किलो गहू स्वतःहून वाटप केला. तरुणांच्या या वाटपाचे देखील जनतेने स्वागत केले. पारगाव येथील तरुण मंडळीचा हा आदर्श अन्य खेड्यातील तरुणांना घेऊन गरजूंना लहान-मोठी मदत करण्यासाठी पुढे यावे, असे ही अँड. देशमुख यांनी यावेळी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published.