Home » माझा बीड जिल्हा » शिक्षक आमदार निष्प्रभ – प्रा.कांबळे

शिक्षक आमदार निष्प्रभ – प्रा.कांबळे

शिक्षक आमदार निष्प्रभ – प्रा.कांबळे

-/ डोंगरचा राजा / आँनलाईन.

– विनाअनुदानित शिक्षकाना वेतन मिळून देण्यात शिक्षक आमदार निष्प्रभ

– राज्य संघटनेचे उपाध्यक्ष प्रा.राहुल कांबळे यांची टीका

बीड – महाराष्ट्र राज्यातील विना
अनुदानित उच्च माध्यमिक शिक्षकांचे गेली २० वर्षे प्रलंबित असलेला वेतन अनुदानाचा प्रश्न मिटवण्यात राज्यातील सगळेच शिक्षक आमदार निष्प्रभ ठरले आहेत अशी टीका महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविदयलालयीत कृती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रा .राहुल कांबळे यांनी केली आहे.वेतनाचा प्रश्न त्वरित सुटत नसेल तर राज्यातील सर्व शिक्षक आमदारांनी आपले राजीनामे त्वरित मुख्यमंत्री यांचे कडे सुपूर्द करावेत अशी आग्रही मागणी प्रा .राहुल कांबळे यांनी केली आहे.
विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षकांचा प्रश्न जर २०-२० वर्ष प्रलंबित राहत असेल तर शिक्षक प्रतिनिधी काय कामाचे असा सवाल प्रा राहुल कांबळे यांनी केला आहे.

विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांचा अनुदान निधी वितरण या बाबतचा शासन निर्णय निघावा याकरिता संघटनेच्या वतीने 230 पेक्षा जास्त वेळ आंदोलने तसेच राज्यातील शिक्षक आमदार माननीय मुख्यमंत्री माननीय विरोधी पक्षनेते देशाचे पंतप्रधान सर्व शिक्षक आमदार यांना निवेदन देण्यात आले मात्र सरकारने त्याची दखल घेतली नाही, अगोदरच पगार नाही खाण्यापिण्याची अवस्था देखील खराब झालेली आहे. सांगायला शिक्षक असलो तरी शिक्षकांची स्थिती अतिशय वाईट आहे. देशातील हात मजुरांपेक्षाही वाईट स्थितीमध्ये सद्यस्थितीला ही शिक्षक जगताहेत आता अजून अनुदानाचा निधी देण्यास उशीर झाल्यास शिक्षकांमध्ये नैराश्य येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे अशाच या विविध प्रश्नांच्या संदर्भात राज्यातील शिक्षक आमदार यांच्या कडून शिक्षकांचा प्रश्न मिठावा यासाठी सतत निवेदने देण्यात येत आहेत पण यांच्या निवेदनाची दखल न घेता सध्या त्यांच्या निवेदनांना केराची टोपली दाखवली जात असल्याचे चित्र उभ्या महाराष्ट्राला दिसत आहे.

राज्यात विधानपरिषदेवर शिक्षक आमदार म्हणून विक्रम काळे,श्रीकांत देशपांडे,दत्तात्रय सावंत,बाळाराम पाटील,किशोर दराडे,कपिल पाटील,ना गो गाणार नेतृत्व करीत आहेत.परंतु शासन व प्रशासन दरबारी लोकप्रतिनिधिंचा प्रभाव दिसत नाही यामुळे उच्च माध्यमिक शिक्षकांचा प्रश्न न मिटण्याचे मुख्य कारण शिक्षक आमदारांचे मुख्यमंत्र्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत कुणीही ऐकत नाही,व दुसरे म्हणजे शिक्षक आमदारांना हा प्रश्न मुद्दाम हेतुपुरस्कर प्रलंबित ठेवण्यात धन्यता वाटत असल्याची टीका करत प्रा.राहुल कांबळे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

शिक्षक आमदार व शासन या दोघांनी मिळून विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षकांचा प्रश्न न मिटवून पाठीत न मारता पोटावर वार केला असल्याचे प्रा .कांबळे यांनी पत्रकारांना सांगितले.शिक्षकांच्या प्रश्नांसंबंधी शिक्षक आमदारांना फोन केल्यावर गेली २० वर्षे करतो,प्रयत्न चालू आहेत, होईल तुमचं,झालं तुमचं काम …अशी गोलमाल उत्तरे देऊन शिक्षकांची बोळवण केली जात असल्याचा आरोप प्रा. राहुल कांबळे यांनी केला आहे.
नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना १०६ कोटी 32 लाख इतका निधीला मंजुरी मिळाली.या निधी च्या वितरणाचा आदेश निघणे अपेक्षित होते परंतु अद्याप हा आदेश निघाला नसल्याने शिक्षकांकडून संताप व्यक्त होत आहे.हा आदेश निघून त्वरित अनुदान वितरित व्हावे अशी मागणी करणारी पत्र सर्वच शिक्षक आमदारांकडून देण्यात आली परंतु या पत्रांची दखल कुणीही घेतली नसल्याचे वास्तव आहे.यापेक्षा वेगळं शिक्षक आमदारांचे अपयश ते कोणतं?असा सवाल कांबळे सरयांनी पत्रकारांसमोर उपस्थित केला.सध्या मजुरांपेक्षा विनाअनुदानित शिक्षकांची वाईट परिस्थिती आहे.विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षक कॉलेज मध्ये उपाशी पोटी विनावेतन राबल्यावर उर्वरित वेळेत शेतात मजुरीची कामे करणे,दूध विकणे,भाजीपाला विकणे,दुकान उपहारगृहात काम करणे,रिक्षा चालवणे अशी अनेक कामे करून कुटुंबाची गुजराण करत आले आहेत.हे सर्वश्रुत आहे.परंतु लॉक डाऊन नन्तर उच्च माध्यमिक शिक्षकांची घरी बसून उपासमार होत असल्याचे चित्र आहे.राज्यातील सर्व घटक कसे जगातील याकडे जातीने लक्ष दिले जात आहे.पण ज्ञान दानाचे उपाशी पोटी पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांना मंजूर निधी वितरित न करता हेळसांड केली जात असल्याची खंत परदेशी यांनी व्यक्त केली.
कोरोना महामारी मध्ये राज्यातला कोणताही घटक व्यक्ती उपाशी मरू नये म्हणून शासन शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी प्रत्येक मतदारसंघातील विधानसभेचे आमदार विधान परिषदेचे आमदार व प्रशासकीय अधिकारी यांच्या माध्यमातून मदत त् पोहोचवून कुटुंबाला जगण्याचा आधार देत आहे परंतु पुरोगामी महाराष्ट्राची शोकांतिका गेल्या वीस वर्षापासून एक रुपया वेतन घेणाऱ्या शिक्षकांच्या अडीअडचणी माहिती असून सुद्धा शिक्षक आमदारांमध्ये एकजुटीचा अभाव असल्याने अद्यापही विनाअनुदानित शिक्षकांना त्यांच्या हक्काचे वेतन देखील मिळाले नाहीत व या उपासमारीच्या काळात त्यांच्यापर्यंत कोणी मुदत पोहोचवण्याची तसदी देखील घेतली नाही ही खंत व्यक्त केली.आता विनाअनुदानित शिक्षकांना हक्काचा मंजूर असलेला निधी मिळवून देण्याच कोण शिवधनुष्य उचलणार असा सवाल प्रा. राहुल कांबळे यांनी केला आहे.हे शिवधनुष्य उचलण्यात अपयश येत असेल तर विनाविलंब राज्यातील शिक्षक आमदारांनी मुख्यमंत्री यांचे कडे राजीनामे द्यावेत अशी मागणी प्रा.राहुल कांबळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.