Home » माझी वडवणी » पिग्मी एजंट वर उपासमारीची वेळ

पिग्मी एजंट वर उपासमारीची वेळ

पिग्मी एजंट वर उपासमारीची वेळ

-/ डोंगरचा राजा / आँनलाईन.

बँक व शासनाने मदत करावी

वडवणी – सध्या जगभरात कोरोना विषाणू मुळे लॉकडाऊन आहे. महाराष्ट्रा सह भारतात संचारबंदी, लाॅकडाऊन आहे. याचा फटका राज्य सह जिल्ह्य़ातील पिग्मी एजंटाना बसला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशात 3 मे पर्यंत देशात संचारबंदी लागू केलेली आहे. यामुळे राज्य सह जिल्ह्य़ातील हजारो पिग्मी एजंट वर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यात संचारबंदी, लाॅकडाऊन असल्याने त्यांच्या दैनंदिन कलेक्शन ला ब्रेक लागला आहे. परिणामी त्यांचा समोर मोठे आर्थिक संकट उभे आहे.
संचारबंदी, लाॅकडाऊन यामुळे छोटे छोटे व्यवसाय पुर्णत:बंद आहेत. अत्यावश्यक सेवा केवळ सुरू आहेत या मध्ये बँका, पतसंस्था, सोसायटींचा समावेश आहे. असे असेल तरी, पिग्मी एजंटाना मात्र संचारबंदी मुळे कलेक्शन (दैनंदिन पिग्मी) वसुल करता येत नाही. दि. 21 मार्च पासुन कलेक्शन बंद आहे
3 मे पर्यंत संचारबंदी, लाॅकडाऊन आहे पूढे कधी कधी चालू होईल हे हि सांगता येत नाही. याचा फटका पिग्मी एजंट च्या कलेक्शनला बसणार आहे.
पिग्मी एजंट हा ग्राहक आणि बँक यामधील दुवा आहे. कर्ज वसुली त्यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात होते. तसेच रोख रक्कम मिळवून देणारा बँकांचा महत्वाचा घटक आहे. कोरोना विषाणू मुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट आले आहे. बँकासह शासनाने त्यांना अडचणीत मदत करावी अशी मागणी होत आहे.
दरम्यान या बाबत मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार, सामाजिक न्याय मंत्री याना ईमेल द्वारे निवेदन देण्यात येणार आहे.
चोकट (पिग्मी एजंटाना दोन ते तीन टक्के कमिशन मिळते संचारबंदी, लाॅकडाऊन मुळे कलेक्शन पुर्णपणे बंद आहे. याचा पगारावर परिणाम होणार आहे. त्यामुळे पिग्मी एजंटाना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बँकासह शासनाने या कडे लक्ष देऊन आर्थिक अडचणीत असलेल्या पिग्मी एजंटाना मदत करून न्याय देवा.)

Leave a Reply

Your email address will not be published.