Home » माझा बीड जिल्हा » अंकुशराव शिंदे पाटील यांना मातृशोक

अंकुशराव शिंदे पाटील यांना मातृशोक

अंकुशराव शिंदे पाटील यांना मातृशोक

-/डोंगरचा राजा/ आँनलाईन

वडवणी – वडवणी येथिल ज्येष्ठ नेते तथा समाजभूषण अंकुशराव शिंदे पाटील यांच्या मातोश्री रतनबाई राजेसाहेब शिंदे वय ८२ वर्ष यांचे काल दिनांक २५ एप्रिल २०२० शुक्रवार रोजी पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले असून दुपारी वडवणी याठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वडवणी येथिल ज्येष्ठ नेते तथा समाजभूषण अंकुशराव शिंदे पाटील यांच्या तसेच बाळासाहेब शिंदे पाटील व युवा उद्योजक संतोष आण्णा शिंदे पाटील यांच्या मातोश्री रतनबाई राजेसाहेब शिंदे वय ८२ वर्ष यांचे काल दिनांक २४ एप्रिल २०२० शुक्रवार रोजी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने राहत्या घरी दुःखद निधन झाले. स्वर्गीय रतनबाई शिंदे यांना अक्का या नावाने संबोधले जायचे. त्या अत्यंत मितभाषी, सदैव प्रसन्न व्यक्तीत्व, धार्मिक प्रवृत्तीच्या व गरजूंना मदतीसाठी सदैव तत्पर असायच्या. जुन्याकाळी त्यांनी अनेक गोरगरिबांच्या संसाराला मदतीचा हात देऊन त्या कुटुंबियांची घडी बसविण्याचे काम केलेले आहे. वडवणी शहरातील प्रतिष्ठित, सुसंस्कारित व सर्वांना मदतीसाठी तत्पर असलेले गावचे पाटील कुटुंबीय सर्वत्र सुपरिचित आहे. आपल्या अक्कांचे निधन झाले असल्याची वार्ता समजतात सर्वत्र दुःखाचा डोंगर कोसळला. सर्वांनी अत्यंत भावपूर्ण वातावरणात व साश्रू नयनांनी अक्कांना शेवटचा निरोप दिला. शुक्रवारी दुपारी त्यांच्यावर वडवणी याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात कुटुंबामध्ये पती, मुले, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार असून शिंदे पाटील कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात डोंगरचा राजा परिवार सहभागी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.