Home » ब्रेकिंग न्यूज » एका खणखणीत नाण्याच्या दोन दणदणीत बाजू.

एका खणखणीत नाण्याच्या दोन दणदणीत बाजू.

एका खणखणीत नाण्याच्या दोन दणदणीत बाजू.

-/ डोंगरचा राजा / आँनलाईन

– मराठी पत्रकार परिषद आणि एस. एम.देशमुख या आता एका खणखणीत नाण्याच्या दोन दणदणीत बाजू झालेल्या आहेत.

– पत्रकार मित्रहो, आता आपलीही जबाबदारी आपण आक्रमकपणे पार पाडू.

मराठी पत्रकार परिषद आणि एस एम देशमुख या आता एका खणखणीत नाण्याच्या दोन दणदणीत बाजू झालेल्या आहेत. आपले नाणे वाजते कारण आपले नेतृत्व निस्वार्थी भावनेने एक एक आव्हान घेऊन कार्यरत आहे. मा. एस एम देशमुख सरांनी आतापर्यंत पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकार पेन्शन, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग असे जे जे विषय हाती घेतले ये यशस्वीपणे सरकारला निर्णय घ्यायला लावून तडीला नेले. आपण सर्व पत्रकारांनी राज्यभर आपली थट्टा होत असताना पण पत्रकार संरक्षण कायद्यासाठी मोर्चे आंदोलन केले. तेव्हा काही लोक कशाला एस एम यांच्या नादाला लागलाय, कायदा होणार आहे काय? असं कुठे होतंय होय? असं सांगून आपल्या उत्साहावर विरजण घालण्याचा प्रयत्न करत होते. पत्रकाराला पेन्शन सरकारकडे का मागायची असे म्हणत होते. (गंमत म्हणजे त्यातीलच काही पेन्शन सुरू होताच हावरटपणे अर्ज करण्यास पुढे धावत होते) पत्रकार परिषद ही संघटनाच नाही, एस एम यांचा त्याच्याशी काही संबंधच नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अशा एक ना अनेक अफवा उठवत होते आणि आजही उठवत आहेत. तुम्ही आम्ही बरेचजण या सर्वच बाबतीत अनभिज्ञ होतो. त्यामुळे मोठे लोक जे सांगतात ते खरं असेल असे म्हणून गप्प बसत होतो. आमची संघटना तशी नाही. एस एम यांच्याबद्दल तुमचा गैरसमज झालाय असं म्हणून वेळ मारून नेत होतो.
पण मित्रांनो,
आता वेळ आली आहे या सगळ्या अपप्रचाराला जिथे तिथे एका ठोक्यात उत्तर देण्याची! समजून घ्या ही मळमळ का आहे ती! टीका करणाऱ्या बऱ्याच लोकांना त्यांच्या तालुक्याच्या बाहेर जिल्ह्याच्या बाहेर कोणी ओळखत सुध्दा नाही. किंवा त्यांच्या गावातले लोक त्यांना किंमत सुध्दा देत नाहीत. पण एस एम देशमुख यांनी त्यांना त्या त्या तालुका जिल्ह्याचे नेतृत्व त्यांना घर बसल्या द्यावं अशी त्यांची अपेक्षा! आणि एस एम सर त्यात हस्तक्षेप करत नाहीत. मग अशी कोपऱ्यात पडलेली मंडळी परिषद आणि एस एम देशमुख यांची बदनामी सुरू करतात. त्यांनी त्यांच्या जिल्ह्यात काय काम केले हे एकदा तपासून बघा म्हंजे त्यांची लायकी समजेल.
काही लोकांच्या चुकीमुळे ( विशेष करून आमच्या सांगलीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीचे योग्य दस्तऐवजिकरण त्या त्या वेळच्या महनीय मंडळीनी केले नाही किंवा केलेले जपून ठेवले नाही त्यामुळे) अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद या नावालाच आव्हान देत राज्याच्या एका जिल्ह्यात एक धर्मादाय संस्थेची नोंदणी झाली. आणि त्यामुळे सुरू झालेल्या न्यायालयीन लढाई नंतर मराठी पत्रकार परिषद अशी आपली नाव नोंदणी करावी लागली. *मित्रांनो, हे समजून घ्या प्रभावी संघटना या मूलतः दबावगट असतात आणि त्यांना नोंदणीची आवश्यकता नसते असे आपले संविधान सांगते. आपली संघटना नोंदणीकृत आहे राज्यात कुठल्याही पत्रकार संघटनेकडे नाहीत इतके आपले सभासद आहेत.* त्यामुळे शतकाकडे वाटचाल करणाऱ्या आपल्या परिषदेच्या धुरिणांनी त्यावेळी नोंदणी आणि त्यानंतरच्या दस्त ऐवज जपण्यासाठी फारसा वेळ दिला नसेल. अगदी आजही आपल्या अशाच चुका होतात. नोंदणी असून चेंज रिपोर्ट दिले जात नाहीत, निवडी रखडतात संघटनेत शिथिलता येते, काही काळ निराशही होते. पण पुन्हा संघटना जोमाने वाढू लागतात. पण नोंदणीकृत संस्थेतील बदल नोंदणी करणे राहिले की ती चूक साचत जाते. परिषदेच्या बाबतीत नेमके असेच घडले. पण प्रभावी संस्थांमध्ये सुध्दा असे होऊ शकते. *शरद जोशी यांची शेतकरी संघटना ही प्रदीर्घ काळ या देशातील सर्वात मोठ्या ग्रामीण लोकसंख्येचा दबावगट होती. त्याची नोंदणी त्यांनी आपल्या हयातीत केली नाही. पण त्याचा लाभ उठवत काही लोकांनी शेतकरी संघटना म्हणून नोंदणी करून घेतली. त्यांना वाटले शरद जोशींचा खेळ संपला. पण नोंदणी करणारे उघडे पडले. जनतेने त्या लोकांना कधीच स्वीकारले नाही. म्हणजेच नोंदणीचा कागद हा काही संघटनेच्या मालकीचा पुरावा असतं नाही. नोंदणी गरजेची आहे पण ती काही मालकी हककाचे ठिकाण नाही.* संघटनेचा उद्देश आणि त्या उद्देशाला पूरक काम हे महत्वाचे असते.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ज्या कारणांसाठी स्थापन झाली त्याच्या पूर्ततेसाठी संपूर्ण देशभरात मराठी पत्रकारांच्या हिताला प्राधान्य देऊन गेल्या दोन दशकात कोण झटले असेल तर ते एस एम देशमुख हेच आहेत. हे समजून घ्या. लोकांची मळमळ इथे आहे. आपण इतकी वर्षे आहोत पण असे काही घडवू शकलो नाही पण जी व्यक्ती तत्त्वावर ठाम राहिली, आपली संपादक पदाची नोकरी सोडली तरी संघटनेचे वेड डोक्यातून सोडत नाही आणि मराठी पत्रकार परिषद हे नाव घेऊन संपादकपद सोडल्या नंतरच्या आयुष्यात विक्रमा वर विक्रम करत चालली आहे ती व्यक्ती डोळ्यात खुपणारच हो!
काही लोक एस एम सरांचे समवयस्क आहेत काही ज्येष्ठ असतील. पण त्यापैकी कोणीही पायाला भिंगरी लावली नाही, कायद्यासाठी टोकाची लढाई लढली नाही. देशात पहिला कायदा ज्या व्यक्तीच्या हट्टाने ( होय हट्टाने च!) जन्माला आला त्याच्या वाट्याला ही अवहेलना का? *संपूर्ण देशातील पत्रकार महाराष्ट्र राज्यात झाला तसा कायदा आपापल्या राज्यात आणि देशभर करा म्हणत आहेत. केंद्रावर असा कायदा करण्यासाठी दबाव आहे. आणि देशाला दिशादर्शक असा कायदा ज्या व्यक्तीमुळे अस्तित्वात आला ती व्यक्ती म्हणजे एस एम कदम यांची मात्र नाहक बदनामी केली जात आहे.* हे लोक परिषदेचा राज्यव्यापी कार्यक्रम असला की एक अफवा उठवतात की परिषदेवर प्रशासक नेमला आहे. एस एम देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आणि प्रमुख पाहुण्यांनी त्या कार्यक्रमाला जाऊ नये! राज्यातील काही संघटना सुध्दा अशा लोकांना मग बाहुल्या सारखे वापरून घेतात आणि आपण कोणीतरी आहोत अशा आविर्भावात ते बुझगावणे गावोगाव बदनामी करायचे काम करते.
*तर मित्रहो,*
हे इतके सविस्तर लिहिण्याचे कारण म्हणजे एस एम देशमुख अशांच्या बदनामी मुळे छोटे होत नाहीत. *देशात पत्रकारांच्या संरक्षणार्थ निर्माण झालेल्या पहिल्या कायद्याचे शिल्पकार म्हणून भारतीय वृत्तपत्र सृष्टीत त्यांची कामगिरी आता अजरामर झालेली आहे! एस एम सर आपल्या पिढी बरोबर वावरत असल्याने आपणास त्यांचे हे मोठेपण जाणवत नाही.* किंवा स्वतः सर ही त्याची जाणीव होऊ देत नाहीत. उलट स्वतः श्रेयाच्या सत्कार स्वीकारताना ते कायद्यात, पेन्शन योजनेत असलेल्या त्रुटी विरुध्द आपल्याला लढायचे आहे हेच सांगतात! काहीही लपवून न ठेवता वास्तवात जगणारा असा *आपला नेता इतक्या मोठ्या का सुध्दा बदनाम का व्हावा? हे आता आपणास ठरवावे लागेल. या बदनामी करणाऱ्यांचा अपमान करायची वेळ आली तर करून तुमची लायकी आहे का? एस एम यांच्यावर टीका करायची? तुमचे संघटन किती लोकांचे आहे? हे त्या लोकांना आता आपण विचारले पाहिजे. ज्येष्ठ म्हणून आपण ज्यांना मान देत आलो त्यांना आता या वयात आमच्याकडून पाणउतारा करून घेऊ नका असे सांगायची वेळ आली आहे.* कोणत्यातरी एका नव्हे तर प्रत्येक जिल्ह्यात आपण अशी तयारी ठेवावी त्याशिवाय बदनामीचे हे राजकारण थांबणार नाही. *एस एम सर, नाईक सर आपल्याला हे सांगणार नाहीत पण आता ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे.*

*_वेळ आली आहे उत्तर देऊयाच!_*

*-शिवराज काटकर*

Leave a Reply

Your email address will not be published.