Home » माझी वडवणी » वडवणी पोलीस स्टेशनच्या..

वडवणी पोलीस स्टेशनच्या..

वडवणी पोलीस स्टेशनच्या..

-/ डोंगरचा राजा / आँनलाईन

पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचा डोंगरचा राजा परिवाराकडून वडवणीत गौरव.

वडवणी / प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने प्रशासनाने लागू केलेल्या संचारबंदी मध्ये
वडवणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेशकुमार टाक,पोलीस उपनिरीक्षक परदेशी, पोलीस उपनिरीक्षक गव्हाणे व सर्व कर्मचारी चोख कामगिरी करत असल्याने वडवणी येथील डोंगरचा राजा परिवाराच्या वतीने संपादक अनिल वाघमारे यांच्या हस्ते नुकताच गौरव करण्यात आला.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने प्रशासनाने लागू केलेल्या संचार बंदीचे पालन जनतेने जबाबदारीने करावं म्हणून
वडवणी येथील पोलीस निरीक्षक महेशकुमार टाक,पोलीस उपनिरीक्षक परदेशी, पोलीस उपनिरीक्षक गव्हाणे पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी शहरात व तालुक्यातील सर्व बीट मध्ये अत्यंत चोख बंदोबस्त ठेवला आहे.येथील पोलीस बांधवांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.तरी देखील वडवणी येथे डोंगरचा राजा परिवाराकडून संपादक अनिल वाघमारे यांनी एक सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून. पोलिस बांधव जनतेच्या जिवाचं रक्षण करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून रांत्रंदिवस परिश्रम घेताना दिसतात.अनेकजण म्हणतात ते त्यांचे कामच आहे.ड्युटी आहे हे खरे असले तरी संकट कोणतेही असो आपले कुटूंब वाऱ्यावर सोडून त्याची परवा न करता सामान्य जनतेसाठी दिवसरात्र उभे आहात, पहारा देतात, पोटाला धड पोटभर अन्न मिळत नाही, ना पिण्यासाठी पाणी, कधी तक्रार केली नाही, आणि कर्तव्यही कमी नाही,अंगावर असणाऱ्या खाकीची जबाबदारी व सदरक्षणाय खलनिग्रहनाय या ब्रिद वाक्याची ओळख जनतेला करून देणा-या आपल्या या कर्तव्याला सलाम ..! म्हणत..
वडवणी शहर व तालुक्यातील सर्व बीट मध्ये दिवसरात्रं रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या पोलीसांचा सोशल डिस्टसिंग या नियमानुसार डोंगरचा राजा परिवाराकडून चहापान व सत्कार करण्यात आला.यावेळी संपादक अनिल वाघमारे यांनी संचारबंदीच्या काळात पोलीस प्रशासनाने केलेल्या कामगिरीचा गौरव केला.

Leave a Reply

Your email address will not be published.