Home » महाराष्ट्र माझा » प्रिन्ट मिडियालाच टाळे ठोकण्याचा डाव – एस.एम.देशमुख

प्रिन्ट मिडियालाच टाळे ठोकण्याचा डाव – एस.एम.देशमुख

प्रिन्ट मिडियालाच टाळे ठोकण्याचा डाव – एस.एम.देशमुख

-/ डोंगरचा राजा / आँनलाईन

मुंबई : आज लोकमान्य टिळक असते तर पुन्हा गर्जले असते, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असं दिसतंय की कोरोनाची हाताळणी करता करता सरकार पार गोंधळून गेलंय.. सरकारनं आज एक गमतीशीर आदेश काढलाय.. सरकारनं एका बाजुनं प्रिन्ट मिडियाला टाळेबंदीतून सूट दिली असली तरी दुसरया बाजुनं पेपर डोअर टू डोअर वाटप करण्यास बंदी घातली आहे.. मग छापलेली वर्तमान पत्रं कोणी वाचायची.. यातही गंमत अशी कुरियर सेवेला बंदी नाही मात्र वर्तमान पत्रं वाटपाला बंदी घातली गेली आहे.. प्रिन्ट मिडिया अगोदरच अडचणीत असताना सरकारचा हा निर्णय शवपेटीवर अखेरचा खिळा ठोकणारा आहे.. या निर्णयाचे तीव्र पडसाद मुद्रित माध्यम क्षेत्रात उमटले आहे.. सरकारला प्रिन्ट मिडियाला टाळे ठोकायचे आहे.काय असा प्रश्न पडतो..
मराठी पत्रकार परिषद हा विषय गंभीरपणे घेत असून या विरोधात परिषद महाराष्ट्र भर रान उठविणार असल्याची घोषणा एस.एम.देशमुख यांनी केली आहे.. आंदोलनाचे स्वरूप कसे असेल याचा निर्णय परिषदेच्या आज रात्री होणारया झुम बैठकीत घेतला जाईल असेही देशमुख यांनी जाहीर केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published.