Home » ब्रेकिंग न्यूज » २४६ दुचाकी वाहनावर गुन्हे दाखल.

२४६ दुचाकी वाहनावर गुन्हे दाखल.

२४६ दुचाकी वाहनावर गुन्हे दाखल.

-/डोंगरचा राजा / आँनलाईन

– बीड पोलिसांची कारवाई गुन्हे दाखल.

– बीड जिल्हा पोलिसांची कारवाई संचारबंदी शिथिलीकरण कालावधीत विनाकारण फिरणाऱ्या 246 दुचाकी वाहनावर बीड पोलिसांची कारवाई गुन्हे दाखल

बीड- पोलीस अधीक्षक श्री हर्ष पोद्दार यांनी संचार बंदीच्या काळात जिल्ह्यात अवैध धंदे संचारबंदी चा संधीचा फायदा घेऊन लोकांची फसवणूक करणारे संचारबंदी च्या नियमांचे उल्लंघन करणारे विनाकारण रस्त्यावर फिरणारे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेला दिले आहेत.

त्यातूनच अप्पर पोलीस अधीक्षक श्री विजय कबाडे यांनी काल दिनांक 16 4 2019 रोजी जिल्ह्यातील शहरी पोलिस ठाण्यांमध्ये शेती करण कालावधीत विनाकारण वाहने घेऊन रस्त्यावर फिरणाऱ्या वर गुन्हे दाखल करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.

संचारबंदी शिथिलीकरण कालावधीत नागरिकांनी दुचाकी घेऊन घराबाहेर न पडता पायी चालत जाऊन जवळच्या भागातून अत्यावश्यक सेवा प्राप्त कराव्यात असे अपेक्षित आहे. आणि याच कारणास्तव अत्यावश्यक सेवा देणारे वाहन वगळता इतर वाहनांना बीड पोलीस इंधन देणेबाबत पेट्रोल पंप चालकांना सक्त मनाई करण्यात आली आहे. अशा प्रकारचे नियम माननीय जिल्हाधिकारी यांनी यांच्याकडून पूर्ण जिल्ह्यात लागू आहेत. तरी या नियमांची पायमल्ली करत नागरिक संचारबंदी शिथिलीकरण कालावधीत मोठ्या प्रमाणावर वाहनांचा वापर करून विशिष्ट भागात गर्दी करत आहेत. अशा प्रकारच्या दुचाकी व चारचाकी वाहनधारकावर यापूर्वी पहिल्या टप्प्यामध्ये दंडात्मक कारवाई करून नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न बीड पोलिसांनी केला होता.तरी दंडात्मक कारवाई करून नियंत्रण प्राप्त झाले नसल्याने बीड पोलिसांनी रहदारीचा उपाय म्हणून गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.आज दिनांक 17 एप्रिल 2020 रोजी सकाळी सात ते साडे नऊ वाजेपर्यंत संचारबंदी असताना विनाकारण लोक दुचाकी वाहने घेऊन घराबाहेर पडून रस्त्यावर गर्दी करत होते. म्हणून त्यांच्यावर खालील नमूद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत बीड शहर 53 दुचाकी वाहने, पेठ बीड 14 दुचाकी वाहने, शिवाजीनगर 50 दुचाकी वाहने, बीड ग्रामीण पाच दुचाकी वाहने,पिंपळनेर 40 दुचाकी वाहने, आंबेजोगाई ग्रामीण 23 दुचाकी वाहने,आंबेजोगाई शहर पन्नास दुचाकी वाहने, परळी शहर पाच दुचाकी वाहने, संभाजीनगर सहा दुचाकी वाहने, या नऊ पोलिस ठाण्यांतर्गत 246 दुचाकी वाहनावर वेगवेगळे नऊ गुन्हे भादवि कलम 188 ,269, 270 आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 17 प्रमाणे दाखल करण्यात आले असून सदरचे 246 वाहने जप्त करण्यात आली आहेत.वरील कारवाई पोलीस अधीक्षक श्री हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वर नमूद नऊ पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी आणि पोलिस कर्मचारी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.